मुंबईत पावसाची उसंत ! विमानतळावरील रनवेची साफसफाई, उड्डाणं सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 08:47 AM2017-09-21T08:47:11+5:302017-09-21T09:50:05+5:30

मुंबई शहर व उपनगर, नवी मुंबई, ठाणे-कल्याण, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली भागांत गुरुवारी पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. दरम्यान, काही भागांमध्ये पावसाची रिमझिम सुरू आहे.

Rains of rain in Mumbai! Cleaning the runway at the airport, start the flight | मुंबईत पावसाची उसंत ! विमानतळावरील रनवेची साफसफाई, उड्डाणं सुरू

मुंबईत पावसाची उसंत ! विमानतळावरील रनवेची साफसफाई, उड्डाणं सुरू

googlenewsNext

मुंबई, दि. 21 -  मुंबई शहर व उपनगर, नवी मुंबई, ठाणे-कल्याण, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली भागांत गुरुवारी पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. दरम्यान, काही भागांमध्ये पावसाची रिमझिम सुरू आहे. मात्र येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. येत्या २४ तासांसाठी पावसाचा मारा सुरू राहील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला असून, हा अंदाज खरा ठरला तर गुरुवारी दुपारी १२.३६ वाजताच्या भरतीमुळे मुंबई पुन्हा पाण्यात जाण्याची भीती आहे.

विमान वाहतुकीचे 'पाणी'पत
मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात मुंबई विमानतळाच्या रनवेवर अडकलेले स्पाईस जेटचं विमान बुधवारी रात्री बाहेर काढण्यात आले. यानंतर रनवे स्वच्छ करण्याचेही काम पूर्ण झाले असून एअर इंडिया वगळता सर्व विमानांची उड्डाणं सुरू करण्यात आली आहेत. एअर इंडियाची विमानसेवाही काही वेळेत सुरू करण्यात येणार आहे.  बुधवारी रात्री ९.३८च्या सुमारास रुतलेले विमान बाहेर काढण्यात यश मिळाले. मुसळधार पावसामुळे विमानतळावरील हवाई वाहतूक थांबवण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतला. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ५१ विमाने वळविण्यात आली. दरम्यान, बुधवारी ( 20 सप्टेंबर ) मुंबईत विमानतळाचा मुख्य रनवे बंद असल्यानं 183 विमान उड्डाणं रद्द करण्यात आली.  तर ५१ विमाने अन्यत्र वळविण्यात आली. खराब हवामानामुळे धिम्या गतीनं विमानांचे उड्डाण आणि लँडिंग सुरू होते. 

स्पाइस जेटचं विमान घरसलं
मंगळवारी रात्री १० वाजून ५ मिनिटांनी ‘स्पाइस जेट’चे वाराणसी-मुंबई विमान धावपट्टीवरून घसरले. यावेळी विमानात १८३ प्रवासी होते. विमानाचे चाक धावपट्टी शेजारील चिखलात रुतले.  

विमान उड्डाणं रद्द करण्यात आल्यानं याचा आर्थिक फटका प्रवाशांना बसू नये यासाठी जवळपास सर्व विमानसेवा कंपन्यांनी तिकिटाचे पैसे परत देणे, प्रवाशांना कोणत्याही शुल्काशिवाय विमानांच्या तिकिटाटे आरक्षण रद्द करण्याची मुभा देण्याचे जाहीर केले.

 हॉलीडे स्पेशल वेळापत्रक
बुधवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्यामुळे, मध्य रेल्वेवर हॉलीडे-स्पेशल वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालविण्यात आल्या. मध्य रेल्वे, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या.

आज रद्द करण्यात आलेल्या एक्स्प्रेस
मनमाड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस
सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस
सीएसएमटी-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस
पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस
पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस
वळविण्यात आलेल्या एक्स्प्रेस
भुसावळ-पुणे एक्स्प्रेस
पुणे-भुसावळ एक्स्प्रेस
अंशत: रद्द केलेल्या एक्स्प्रेस
मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस (नाशिक रोड ते एलटीटी)
एलटीटी-मनमाड गोदावरी एक्सप्रेस (एलटीटी ते नाशिक रोड)

Web Title: Rains of rain in Mumbai! Cleaning the runway at the airport, start the flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.