मुंबई : पावसाच्या बदलत्या ट्रेण्डमुळे दरवर्षी पाणीप्रश्न भीषण रूप घेऊ लागला आहे़ त्याचवेळी पाणीटंचाईवर तोडगा म्हणून हाती घेतलेला रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प मात्र फेल गेला आहे़ वारंवार सूचना व कारवाईचा धाक दाखवून मुंबईत हजारो नवीन इमारतींमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत नसल्याचे उजेडात आले आहे़ त्यामुळे छतावरून हजारो लीटर पावसाचे पाणी वाहून वाया जात आहे़भूजलाची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने पालिकेने ५०० चौ़मी़ जागेतील इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सक्तीचा केला़ इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी मालमत्ता करात सूट देण्याची योजना १ एप्रिल २०१०पासून पालिकेने अंमलात आणली़ राज्य सरकारने धोरण व नियमावली तयार न केल्यामुळे या योजनेचे निकष आणि इमारतींवर देखरेखीसाठी यंत्रणा उभी राहू शकली नाही़ तसेच खर्चीक असल्याने अनेक इमारती या प्रकल्पासाठी इच्छुक नाहीत़ मुंबईत मोठ्या प्रमाणात इमारतींची पुनर्बांधणी होत आहे़ मात्र या इमारतींमध्ये हा प्रकल्प राबविला जात नाही़ पालिकेचे उद्यान, शाळा व रुग्णालयांमध्येही हा प्रकल्प उभारण्याबाबत प्रशासनच उदासीन असल्याचेही दिसून आले आहे़ त्यामुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये हजारो इमारतींची भर पडली़ तरी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प १० टक्के इमारतींमध्येही नसल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे़ (प्रतिनिधी)योजनेतील अडचणीछतावरून गळून जाणारे पावसाचे पाणी पायपाद्वारे टँकमध्ये साठवून पाण्याची बचत करण्याची योजना म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग़ हा प्रकल्प असलेल्या इमारतींना मालमत्ता करामध्ये पाच टक्के सूट देण्याची तरतूद नियमात आहे़ परंतु याबाबत निश्चित धोरण नसल्यामुळे ही योजना रखडली आहे़ या योजनेसाठी पात्र इमारत व त्यावरील देखरेख करणारी यंत्रणा कशी असावी? याबाबत नियमामध्ये स्पष्टता नाही़या योजनेचा लाभ घेण्यासाठी इमारती रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारतील़ मात्र त्यानंतर हा प्रकल्प कार्यान्वित आहे का? याची नियमित खातरजमा कशी करावी? याबाबतही अद्याप काही ठरलेले नाही़
‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ फेल
By admin | Published: July 05, 2016 2:16 AM