एका दिवसात मुंबईत पावसाची विश्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:14 AM2021-09-02T04:14:04+5:302021-09-02T04:14:04+5:30
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी दमदार हजेरी लावलेल्या पावसाने एका दिवसात म्हणजे बुधवारी विश्रांती घेतली. बुधवारी सकाळी ...
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी दमदार हजेरी लावलेल्या पावसाने एका दिवसात म्हणजे बुधवारी विश्रांती घेतली. बुधवारी सकाळी किंचित पडलेल्या पावसाने मुंबई शहर आणि उपनगरात दुपारी आणि सायंकाळी पाठ फिरवली. गुरुवारीदेखील पाऊस असाच असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुंबईच्या उपनगरात भल्या पहाटे पावसाचे ढग दाटून आले होते. शिवाय उपनगरात काळोखदेखील झाला होता. परंतु, पावसाची अगदीच रिमझिम सुरू होती. पाऊस दुपारी कोसळेल, असा अंदाज असताना दुपारी मात्र चक्क ऊन पडले होते. मुंबई शहरात बहुतांश ठिकाणी दुपारी पावसाचे ढग दाटून आले होते. मात्र पावसाचा काही पत्ता नव्हता. सायंकाळीदेखील मुंबईत काही परिसरात ढगांनी गर्दी केली. सर्वदूर काळोखदेखील पसरला. मात्र तेव्हादेखील पाऊस आला नाही. एकंदर सकाळी सक्रिय असलेल्या पावसाने दुपारी आणि सायंकाळी मुंबईकडे पाठ फिरवली होती.