पावसाची विश्रांती तरीही पडझड सुरूच
By admin | Published: July 2, 2017 04:35 AM2017-07-02T04:35:28+5:302017-07-02T04:35:28+5:30
मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी सकाळी पडलेल्या पावसाने दुपारसह सायंकाळी विश्रांती घेतली असली तरी येथील पडझड कायमच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी सकाळी पडलेल्या पावसाने दुपारसह सायंकाळी विश्रांती घेतली असली तरी येथील पडझड कायमच आहे.
कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे ०.२, ६.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात २, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ४ ठिकाणी बांधकामाचा भाग पडल्याच्या घटना घडल्या. शहरात १, पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात १, पूर्व उपनगरात १४ आणि पश्चिम उपनगरात ३५ अशा ५० ठिकाणी झाडे पडली. तर बोरीवली पश्चिमेकडील साईबाबा नगर येथील रामनगर रोडवर रिक्षावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत राजमणी यादव (४५) हे रहिवाशी मरण पावले. अंधेरी पश्चिमेकडील जुहू गल्ली येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत चंद्रभागा वाफेलकर ही महिला जखमी झाली. कुपरमध्ये उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.