पावसाने मुंबईकरांची सकाळ; दुपारनंतर रिमझिम झाली बंद, सायंकाळी पुन्हा बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 01:22 AM2020-07-25T01:22:37+5:302020-07-25T06:44:02+5:30
कुलाबा येथे ३९.८ आणि सांताक्रुझ येथे १७.८ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात विश्रांती घेतलेल्या पावसाने शुकवारी सकाळी बऱ्यापैकी जोर पकडला. पूर्व, पश्चिम उपनगरासह शहरात किंचित ठिकाणी तुरळक कोसळलेल्या पावसाने नंतर मात्र आपला मारा कमी करीत रिमझिम सुरू केली. सकाळी सुरू असलेली ही रिमझिम दुपारनंतर पूर्णत: बंद झाली. केवळ दाटून आलेल्या ढगांनी सातत्याने पावसाची वर्दी दिली. मात्र दुपारसह सायंकाळीदेखील पाऊस बेपत्ता झाला होता.
कुलाबा येथे ३९.८ आणि सांताक्रुझ येथे १७.८ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी सकाळी पावसाची रिमझिम सुरू असतानाच ७ ठिकाणी झाडे कोसळली. ४ ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सांताक्रुझमधील कलिना सुंदर नगर येथे इमारतीच्या बांधकामाकरिता केलेल्या खड्ड्यात एक मनुष्य आढळून आला.
पोलिसांमार्फत त्यास बाहेर काढून व्ही. एन. देसाई रुग्णालयात पाठविण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, २६ आणि २७ जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगरात पाऊस पुन्हा सक्रिय होईल. हा पाऊस मुसळधार ते अति मुसळधार नसला तरी सध्याच्या वातावरणाच्या तुलनेत दिलासादायक असेल. कुलाबा येथे ३९.८ आणि सांताक्रुझ येथे १७.८ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी सकाळी पावसाची रिमझिम सुरू असतानाच ७ ठिकाणी झाडे कोसळली.