Join us

रात्र पावसाची! मुंबई, ठाण्यात पुढील तीन चार तास मुसळधार कोसळणार; पाणी साचण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 11:57 PM

Rain Alert Mumbai, Thane Suberb: कोकण पट्ट्याला पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. आज मध्यरात्री नंतर पुढील तीन चार तास मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. यामुळे सखल भागात पाणी साचण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बीड, लातूर, जालना, परभणी आणि राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये दोन मोठ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. 

कोल्हापूरमध्ये राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. परशुराम घाट कोसळला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणेसह नागपूरमध्ये एनडीआऱएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. 

कोकण पट्ट्याला पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

टॅग्स :पाऊस