Join us

पावसाची विश्रांती

By admin | Published: June 28, 2015 2:25 AM

मुंबई शहर आणि उपनगराला झोडपून काढणाऱ्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. मुंबईकरांना दिवसभर ऊन्हाच्या झळा बसत असून, कमाल तापमानात झाली आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला झोडपून काढणाऱ्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. मुंबईकरांना दिवसभर ऊन्हाच्या झळा बसत असून, कमाल तापमानात झाली आहे.हवामान शास्त्र विभागाने शुक्रवारी मान्सूनने देश व्यापल्याची घोषणा केली असतानाच शुक्रवारसह शनिवारी मुंबईतील वातावरण कोरडे होते. दुपारी दादरला आलेली मोठी सर वगळता सायंकाळी ४ नंतर मुंबईवर ढगांची गर्दी झाली होती. पावसाच्या विश्रांतीमुळे शहराच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येऊ लागली आहे. २७ आणि २४ अंशावर खाली घसरलेले कमाल, किमान तापमान पुन्हा अनुक्रमे ३३, २७ अंशावर पोहचले आहे. पुढील २४ तासांत मुंबईमध्ये मेघगर्जनेसह सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.