पान १साठी.....ऑक्टोबर हिटला पावसाची सलामी!

By admin | Published: September 30, 2014 09:39 PM2014-09-30T21:39:07+5:302014-09-30T21:39:07+5:30

(पान १साठी)

Rainy season for October 1, hit October 1! | पान १साठी.....ऑक्टोबर हिटला पावसाची सलामी!

पान १साठी.....ऑक्टोबर हिटला पावसाची सलामी!

Next
(प
ान १साठी)
.......................
ऑक्टोबर हिटला पावसाची सलामी! पावसाचा परतीचा प्रवास सुरु
मुंबई : एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरु झालेली असताना परतीचा पाऊसही मुंबईत धडाक्यात मेघगर्जनेसह मुंबापुरीत दाखल झाला आणि चाकरमान्यांची एकच धावपळ उडाली. सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटने घामाघूम झालेल्या मुंबईकरांनी सायंकाळच्या पावसाने दिलासा दिला असला तरी आता पुढील काही दिवसांत मुंबईकर ऑक्टोबर हिटने घामाघूम होणार आहेत. परतीच्या पावसात सलग पाच दिवसांचा खंड पडल्यास त्यानंतर तो पुन्हा बरसणार नाही.
राजस्थानातून परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झाला आहे. एक ऑक्टोबरच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातही परतीचा पाऊस दाखल झाला आहे. उत्तरेकडील राज्यासह ईशान्यकडील राज्यांचा प्रवास करत हा परतीचा पाऊस महाराष्ट्रात दाखल झाला. एक ऑक्टोबरपूर्वीच परतीचा पाऊस महाराष्ट्रात दाखल झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. त्यातच सप्टेंबर महिन्यात मुंबईकरांना येथील वातावरण घाम फोडत असताना ऑक्टोबर महिन्याच्या पूर्वसंध्येला मेघगर्जनेसह मुंबापुरीत दाखल झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने एका अर्थाने ऑक्टोबर हिटला सलामीच दिली.
गेल्या पंधरा दिवसांपासून न बरसलेला पाऊस अखेर परतीच्या मार्गावर असताना मुंबईत दाखल झाला आहे. पंधरा दिवसापासून पाऊस नसल्याने मुंबापुरीचे कमाल तापमान ३४ अंशावर पोहचले होते. आणि सोमवारी तर कमाल तापमान ३७ अंश एवढे नोंदविण्यात आले. आता ऑक्टोबर महिन्याच्या पूर्वसंध्येला मुसळधार पावसाने मुंबईकरांना झोडपून काढले असले तरीदेखील पुढील काही दिवसांत तापमान वाढण्याचे हे पूर्वसंकेतच जणूकाही मुंबईकरांना मिळाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Rainy season for October 1, hit October 1!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.