यंदाच्या पावसाळ्यात २४ दिवस ठरणार धोक्याचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 01:18 AM2020-06-04T01:18:17+5:302020-06-04T01:18:31+5:30
समुद्रात उसळणार ४.५ मीटरहून उंच लाटा : मुंबापुरी होणार पुन्हा तुंबापुरी; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनापाठोपाठ चक्रीवादळाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना पावसाळ्यातही सतर्क राहावे लागणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात तब्बल २४ दिवस समुद्राला उधाण येणार आहे. या काळात ४.५ मीटरहून उंच लाटा उसळणार आहेत. अशा काळात मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईची तुंबापुरी होण्याचा धोका आहे. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिन्यांत मुंबईकरांना सावध राहावे लागणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात अशा धोकादायक दिवसांची यादी महापालिकेमार्फत तयार करण्यात येते. त्यानुसार समुद्र्रात ४.५ मीटरहून उंच लाटा उसळणाºया दिवसांबाबत संबंधित यंत्रणांना सतर्क करण्यात येते. यावर्षी मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोना या आजाराचा प्रसार सुरू झाला. दररोज सरासरी १४०० रुग्ण सापडत आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी कामे उशिरा सुरू झाल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावर्षी पाऊसही सरासरी गाठणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास समुद्र सपाटीपेक्षा खाली असलेल्या मुंबईतील सखल भागांत पाणी तुंबण्याची शक्यता आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ४ ते ९ जून आणि २३ व २४ जून, जुलैमध्ये ४ ते ७ तारीख, २१ ते २४ जुलै असे प्रत्येकी आठ दिवस, आॅगस्टमध्ये १९ ते २२ तर सप्टेंबर महिन्यात १७ ते २१ पर्यंत असे २४ दिवस समुद्र्रात उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी घरात रहावे, असे आवाहन पालिकेने केले आहे कोरोना पाठोपाठ या नव्या संकटाला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे.
जूनमधील
उधाणाचे दिवस
गुरुवार ४ जून (सकाळी १०.५७) - लाटांची उंची ४.५६ मीटर
शुक्रवार ५ जून (सकाळी ११.४५) - लाटांची उंची ४.७५ मीटर
शनिवार ६ जून (दुपारी १२.३३) - लाटांची उंची ४.८२ मीटर
रविवार ७ जून (दुपारी १.१९) - लाटांची उंची ४.७८ मीटर
सोमवार ८ जून (दुपारी २.०४ ) - लाटांची उंची ४.६७ मीटर
मंगळवार ९ जून (दुपारी २.४८) - लाटांची उंची ४.५० मीटर
मंगळवार २३ जून (दुपारी १.४३) - लाटांची उंची ४.५२ मीटर
बुधवार २४ जून (दुपारी २.२५) - लाटांची उंची ४.५१ मीटर
जुलैमधील
उधाणाचे दिवस
शनिवार ४ जुलै (सकाळी ११.३८) - लाटांची उंची ४.५७ मीटर
रविवार ५ जुलै (दुपारी १२.२३) - लाटांची उंची ४.६३ मीटर.
सोमवार ६ जुलै (दुपारी १.०६) - लाटांची उंची ४.६२ मीटर
मंगळवार ७ जुलै (दुपारी १.४६) - लाटांची उंची ४.५४ मीटर
मंगळवार २१ जुलै (दुपारी १२.४३) - लाटांची उंची ४.५४ मीटर
बुधवार २२ जुलै (दुपारी १.२२) - लाटांची उंची ४.६३ मीटर
गुरुवार २३ जुलै (दुपारी २.०३) - लाटांची उंची ४.६६ मीटर
शुक्रवार २४ जुलै (दुपारी २.४५) - लाटांची उंची ४.६१ मीटर
आॅगस्टमधील उधाणाचे दिवस
बुधवार १९ आॅगस्ट (दुपारी १२.१७) लाटांची उंची ४.६१ मीटर
गुरुवार २० आॅगस्ट (दुपारी १२.५५) -लाटांची उंची ४.७३ मीटर
शुक्रवार २१ आॅगस्ट (दुपारी १.३३) -लाटांची उंची ४.७५ मीटर
शनिवार २२ आॅगस्ट (दुपारी २.१४)- लाटांची उंची ४.६७ मीटर
सप्टेंबर महिन्यात उधाणाचे दिवस
गुरुवार १७ सप्टेंबर (दुपारी ११.४७) - लाटांची उंची ४.६० मीटर
शुक्रवार १८ सप्टेंबर (दुपारी १२.२४) - लाटांची उंची ४.७७ मीटर
शनिवार १९ सप्टेंबर (रात्री ००.४५) - लाटांची उंची ४.६८ मीटर, दुपारी १३.०१... ४.७८ मीटर
रविवार २० सप्टेंबर (रात्री ०१.२९) - लाटांची उंची ४.७८ मीटर, दुपारी १३.४०... लाटांची उंची ४.६२ मीटर
सोमवार २१ सप्टेंबर (रात्री ०२.१५) - लाटांची उंची ४.६८
मीटर