पावसाची पाठ!
By admin | Published: July 8, 2017 04:21 AM2017-07-08T04:21:08+5:302017-07-08T04:21:08+5:30
जून महिन्यात दमदार बरसलेल्या सरींनी जून महिन्याच्या उत्तरार्धासह जुलै महिन्याच्या पूर्वाधात मुंबईकरांकडे पाठ फिरविली आहे. परिणामी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जून महिन्यात दमदार बरसलेल्या सरींनी जून महिन्याच्या उत्तरार्धासह जुलै महिन्याच्या पूर्वाधात मुंबईकरांकडे पाठ फिरविली आहे. परिणामी वाढता ऊकाडा मुंबईकरांचा घाम काढत असून, पुढील तीनएक दिवस हीच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना ऐन पावसाळ्यात ऊन्हासह ऊकाड्याचे चटके सहन करावे लागत आहेत.
पश्चिमी वाऱ्याचा कमी झालेला प्रभाव, कमी दबाच्या क्षेत्राचा अभाव इत्यादी कारणांमुळे पावसाने पाठ फिरवल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतून पाऊस हरवला असला तरी मागील २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. ९ जुलैपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शनिवारसह रविवारी मुंबई शहरासह उपनगरात पावसाच्या तुरळक सरी पडतील, असा अंदाज आहे.