Join us

उष्णतेच्या लाटेसह पावसाचा इशारा

By admin | Published: May 22, 2015 1:40 AM

मान्सूनच्या प्रवासाला वातावरण अनुकूल असल्याने केरळात त्याचे आगमन वेळेत म्हणजे ३० मे रोजी होणार आहे.

केरळात मान्सून वेळेवरच : पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर आगेकूच सुरूमुंबई : तब्बल पाच दिवस अंदमानात तळ ठोकून बसलेला मान्सून पुढील वाटचालीसाठी गुरुवारी सक्रिय झाला आहे. मान्सूनच्या प्रवासाला वातावरण अनुकूल असल्याने केरळात त्याचे आगमन वेळेत म्हणजे ३० मे रोजी होणार आहे. तत्त्पूर्वी उत्तरेकडील उष्ण वारे महाराष्ट्रावर वाहतच असल्याने विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहणार आहे. मेघगर्जनेसह वादळी पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मौसमी पावसाची उत्तरी सीमा गुरुवारी पुढे सरकली आहे. नैर्ऋत्य मौसमी पावसाने उर्वरित अंदमान समुद्र, आग्नेय बंगालचा उपसागराचा आणखी काही भाग व नैर्ऋत्य आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तर विदर्भाच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट आहे. मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)22-23 मे : विदर्भाच्या बऱ्याच भागात तीव्र तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या तुरळक भागात उष्णतेची लाट राहील.24-25 मे : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडेल. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सरी कोसळतील.वातावरणातील बदल मान्सूनच्या आगमनासाठी पूरक असल्याने तो वेळेवर दाखल होईल. सध्या मान्सून श्रीलंकेच्या पलीकडे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण व मध्य भागात आहे. बंगालच्या उपसागरात ढग दाटून येत आहेत. येथे मुसळधार पाऊस कोसळत असून, मान्सून वेळेवर दाखल होण्याची ही नांदी आहे.