Join us

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याविरोधात जनजागृती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:06 AM

उच्च न्यायालयाचे राज्य सरकारसह मुंबई महापालिकेला निर्देशसार्वजनिक ठिकाणी थुंकण्याविरोधात जनजागृती कराउच्च न्यायालयाचे राज्य सरकारसह मुंबई महापालिकेला निर्देश...

उच्च न्यायालयाचे राज्य सरकारसह मुंबई महापालिकेला निर्देश

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याविरोधात जनजागृती करा

उच्च न्यायालयाचे राज्य सरकारसह मुंबई महापालिकेला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना काळातही लोक सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे थुंकत असल्याने केवळ आर्थिक दंड ठोठावून काहीही साध्य होणार नाही. या दंडासोबतच लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यावरही भर द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह मुंबई महापालिकेला बुधवारी दिले.

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याविरोधात तयार केलेल्या कायद्याची सरकार व पालिका काटेकोरपणे अंमलबजावणी करत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या अर्मिन वांद्रेवाला यांनी करताना याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पालिकेला दिले.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरोधात तक्रार करणाऱ्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही, अशी तक्रारही वांद्रेवाला यांनी न्यायालयात केली.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून १,२०० रुपये दंड आकारण्याची तरतूद पालिकेने केली आहे. तरीही लोक सार्वजनिक ठिकाणी थुंकत असल्याची बाब याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई करत असून, सध्या बीट मार्शलसह पोलिसांना ड्युटी लावण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या वकिलांनी न्यायालयाला दिली.