Join us

गाडीचे कोच वाढवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:09 AM

मुंबई : मध्य रेल्वेने गणपती उत्सवात प्रवाशांच्या सोयीसाठी गाडी क्र. दादर-सावंतवाडी रोड-दादर विशेष गाडीमध्ये ४ ते २५ सप्टेंबरपर्यंत ...

मुंबई : मध्य रेल्वेने गणपती उत्सवात प्रवाशांच्या सोयीसाठी गाडी क्र. दादर-सावंतवाडी रोड-दादर विशेष गाडीमध्ये ४ ते २५ सप्टेंबरपर्यंत एक एसी ३ टायर कोच, तीन स्लीपर कोच आणि एक सेकंड सीटिंग कोच तात्पुरते वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

----

विशेष गाड्यांच्या सेवांचा विस्तार

मुंबई : मध्य रेल्वेने खालील विशेष गाड्यांच्या धावण्याचा कालावधी पुढील सूचना मिळेपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, गाड्यांची संरचना, वेळ व थांबे यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. यामध्ये पाटणा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (रविवार व बुधवार) दिनांक २९ ऑगस्टपासून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष-पाटणा (मंगळवार व शुक्रवार) ३१ऑगस्टपासून, रक्सौल-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (गुरुवार) २६ ऑगस्टपासून, लोकमान्य टिळक टर्मिनस-रक्सौल विशेष (शनिवार) २८ ऑगस्टपासून, रक्सौल-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (सोमवार) ३० ऑगस्टपासून, लोकमान्य टिळक टर्मिनस- रक्सौल विशेष (बुधवार) १ सप्टेंबरपासून, रक्सौल-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (शनिवार) २८ ऑगस्टपासून, लोकमान्य टिळक टर्मिनस-रक्सौल विशेष (सोमवार) ३० ऑगस्टपासून सेवा वाढविण्यात आल्या आहेत.

---/-

फूटपाथखालील नाल्याची झाकणे बंद करा

मुंबई : चेंबूर पश्चिम येथे लोकमान्य टिळक पालिका शाळेसमोर फूटपाथखाली असलेल्या नाल्याचे झाकण उघडे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी पडून अपघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे तात्काळ झाकण बसविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.