अपंगांसाठी पायाभूत सुविधा उभारा

By admin | Published: November 5, 2014 03:54 AM2014-11-05T03:54:08+5:302014-11-05T03:54:08+5:30

सुसह्य पायाभूत सुविधांअभावी खाजगी आणि सार्वजनिक ठिकाणी अपंगांना मुक्तपणे वावरता येत नसल्याची खंत सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते अमोल गुप्ते यांनी व्यक्त केली आहे.

Raising infrastructure for the disabled | अपंगांसाठी पायाभूत सुविधा उभारा

अपंगांसाठी पायाभूत सुविधा उभारा

Next

मुंबई : सुसह्य पायाभूत सुविधांअभावी खाजगी आणि सार्वजनिक ठिकाणी अपंगांना मुक्तपणे वावरता येत नसल्याची खंत सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते अमोल गुप्ते यांनी व्यक्त केली आहे. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गुप्ते यांनी अपंगांना ध्यानात घेऊन कोणतीही पायाभूत सुविधा उभारण्याचे आवाहन केले आहे.
गुप्ते म्हणाले, की अपंगत्व म्हणजे एक शाप असल्याची मानसिकता शहरात फोफावत आहे. त्याचाच प्रत्यय म्हणून अपंगांना नेहमी घरातच ठेवले जाते. प्रशासनाने उभारलेल्या सुविधा आणि लोकांची मानसिकता या दोन्ही गोष्टी त्यासाठी कारणीभूत आहे. शहरातील चित्रपटगृहे, रेल्वे स्थानके, हॉटेल अशा सार्वजनिक ठिकाणांवर अपंगांसाठी विशेष व्यवस्था असणे बंधनकारक आहे. मात्र त्याचे पालन कुठेही होत नाही. याउलट परदेशात अपंगांसाठी सार्वजनिक ठिकाणी रँपची व्यवस्था आहे. परिणामी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून अपंगांसाठी काम करणाऱ्या संघटनांना एकत्र आणणार आणि त्यामाध्यमातून अपंगांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे गुप्ते यांनी सांगितले. यावेळी अपंगांच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्या आणि स्वत: अपंग असलेल्या नीनू केवलानी यांनी स्वत:ची व्यथा मांडली. तिरूपती बालाजी देवस्थानात व्हीलचेअरमुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्या म्हणाल्या, ‘मंदीर तर दूरच मात्र अपंगांसाठी सुसह्य अशी प्रसाधनगृहे उभारण्यातही प्रशासन अपयशी ठरले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील रेल्वे स्थानकांवर अपंगांना सुकर ठरेल, असे एकही प्रसाधनगृह नाही. सद्यस्थितीत असलेल्या प्रसाधनगृहांत अपंग व्यक्ती व्हीलचेअरसह प्रवेश करू शकत नाही. त्यासाठी विशिष्ट प्रकारची प्रसाधनगृहे उभारावी लागतात. मात्र प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे विशेषत: अपंग महिलांना तहानलेल्या पोटी प्रवास करावा लागत आहे.’
कडक कायदे करण्याची मागणी
अग्निशामक यंत्रणा नसलेल्या इमारतीला पालिका एनओसी देत नाही. तोच न्याय अपंगांसाठी का नाही? अपंगांसाठी विशेष व्यवस्था न उभारल्यास परवानगी का नाकारली जात नाही, अशी खंत केवलानी यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Raising infrastructure for the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.