‘शूटिंग लोकेशनवर महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारा’

By admin | Published: June 26, 2015 01:55 AM2015-06-26T01:55:03+5:302015-06-26T01:55:03+5:30

महिलांना चित्रीकरणादरम्यान सेटवर अथवा बाह्य चित्रीकरणस्थळी स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करण्याचे आवाहन आज महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी

'Raising Sanitary Halls for Women at Shooting Locations' | ‘शूटिंग लोकेशनवर महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारा’

‘शूटिंग लोकेशनवर महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारा’

Next

मुंबई : महिलांना चित्रीकरणादरम्यान सेटवर अथवा बाह्य चित्रीकरणस्थळी स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करण्याचे आवाहन आज महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेतर्फे सर्व निर्मिती संस्थांना करण्यात आले. तसेच रात्री शूटिंग संपल्यानंतर सर्व महिलांना त्यांच्या इच्छित स्थळी किंवा घरी पोहोचवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शालिनी ठाकरे यांनी केली.
चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी शालिनी ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड केली. पदाचा कार्यभार स्वीकारताना शालिनी ठाकरे यांनी हे आवाहन केले. चित्रपट व नाटक क्षेत्रात सर्वांना समान कामाचा अधिकार आणि सर्व कामगारांना वैद्यकीय व आरोग्य विमा या नवीन संकल्पनेसह संघटनेने सभासद नोंदणी सुरू केली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेतर्फे मराठी चित्रपट व मालिका यांचे जिथे शूटिंग चालू असेल तिथे कोणत्याही फेडरेशनने सेटवर जाऊन कलाकार आणि तंत्रज्ञ सभासदांना सभासद कार्ड विचारून त्रास देऊ नये. जर कोणी त्रास दिलाच तर त्यास महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना मनसे स्टाईल उत्तर देईल, असा इशारा चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यावेळी दिला. यावेळी संजय नार्वेकर, मृणाल कुलकर्णी, आणि अभिजित पानसे उपस्थित होते.

Web Title: 'Raising Sanitary Halls for Women at Shooting Locations'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.