Join us

Raj Kundra Arrest: बड्या नेत्यांची मैत्रीही येईना उपयोगात, पोलीस आयुक्त थेट उद्धव ठाकरेंच्या संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 5:24 PM

Raj Kundra Arrest: सकाळपासूनच शिल्पाला अनेक नेतेमंडळींचे फोन येत असल्याचे समजते. मात्र, मुंबई पोलीस कमिश्नर याप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत.   

ठळक मुद्देमुंबईत पोलीस आयुक्त हेमंत नगराळे याप्रकरणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रिपोर्टींग करत आहेत. तर, मुख्यमंत्र्यांनी कायदा व नियमानुसार कारवाई करण्याची सूट दिल्याचे समजते. याबाबत अमर उजालाने वृत्त दिले आहे.

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री आणि फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टी सध्या रिअ‍ॅलिटी शो सुपर डान्सर 4 जज करत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, पती राजला अश्लील फिल्म्स तयार करणे आणि त्या अ‍ॅपच्या माध्यमाने रिलीज करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. या घटनेनं बॉलिवूडमध्ये खळबल उडाली असून शिल्पा आज शोच्या शूटिंगसाठी गेली नाही. शिल्पा शेट्टी नामवंत अभिनेत्री आहे, तिचे भाजपमधील वरिष्ठ नेत्यांशीही जवळीक आहे. मात्र, पतीच्या अटकेनंतर कुणीही कामी येताना दिसत नाही.   

डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी शिल्पाचा शोच्या शूटिंगचा शेड्यूल होता. मात्र, ती शूटसाठी गेली नाही. कारण सोमवारी रात्रीच तिचा पती राज कुंद्राला मुंबई क्राइम ब्रांचने अटक केली होती. माध्यमांतील वृत्तांनुसार, अभिनेत्री शिल्पा सध्या आपली बहीण शमिता आणि आईसोबत जुहू येथील बंगल्यात आहे. शिल्पा शो सुपर डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. शिल्पाच्या पतीवर गंभीर आरोप झाले आहेत. त्याच्यावर अश्लील फिल्म्स तयार करणे आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा आरोप आहे. सकाळपासूनच शिल्पाला अनेक नेतेमंडळींचे फोन येत असल्याचे समजते. मात्र, मुंबई पोलीस कमिश्नर याप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत.   

मुंबईत पोलीस आयुक्त हेमंत नगराळे याप्रकरणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रिपोर्टींग करत आहेत. तर, मुख्यमंत्र्यांनी कायदा व नियमानुसार कारवाई करण्याची सूट दिल्याचे समजते. याबाबत अमर उजालाने वृत्त दिले आहे. दरम्यान, सागरिका शोना नावाच्या एका मॉडेलने पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये राज कुंद्रा यांचं नाव घेतलं होतं. 14 फेब्रुवारी 2021 व्हॅलेंटाईन डेच्या तीन दिवस अगोदरच सागरिकाने पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी, कुंद्रा यांच्या वकिलांमार्फत याबाबतचे वृत्त दाखवणाऱ्या माध्यमांना नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र, आता हे प्रकरण चांगलेच चव्हाट्यावर आले आहे. 

राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला जेएल 50 या अॅपची ब्रँड अम्बेसिडर बनविण्यात आले होते. राजने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया या कॅम्पेनशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यातूनच, गेल्यावर्षी राष्ट्रीय क्रीडा दिनी दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचण्यात राज आणि शिल्पा यांना यश आले होते. मात्र, याप्रकरणी मुंबई पोलिसांनी थेट कारवाईला सुरुवात केल्याने त्या जवळीकतेचा काहीही उपयोग झाला नाही. 

टॅग्स :शिल्पा शेट्टीभाजपापोलिसमुंबईगुन्हेगारी