Join us

राज कुंद्रा : कोर्टात काय झाले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:06 AM

न्यायालयात राज कुंद्रा याच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला. या गुन्ह्यातील बरीचशी कलमे जामीन मिळण्यासारखी आहेत. त्यामुळे ...

न्यायालयात राज कुंद्रा याच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला. या गुन्ह्यातील बरीचशी कलमे जामीन मिळण्यासारखी आहेत. त्यामुळे कुंद्रा यांना कोठडी देऊ नये, असा युक्तिवाद कुंद्रा यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. या गुन्ह्यात बरेचसे फॉरेन ट्रांझॅक्शन सापडले असल्याने ते तपासण्यासाठी कोठडीची गरज आहे. कुंद्रा यांच्या पोलीस कोठडीशिवाय तपास पूर्ण होणार नाही, असे मुंबई पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. गहना वशिष्ठ आणि वंदना तिवारी यांच्यासोबत कुंद्रा यांच्या कंपनीने जे कॉन्ट्रॅक्ट केले होते ते आम्हाला पडताळायचे आहे, असेही मुंबई पोलीस म्हणाले. राज कुंद्रा या गुन्ह्यात मुख्य सूत्रधार आहे. त्यानेच हे रॅकेट सुरू केले आणि मोठ्या प्रमाणात पैसे मिळवले, असा दावाही मुंबई पोलिसांनी केला आहे. दोघांच्या युक्तिवादानंतर कुंद्रा याला २३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.