Raj Thackeray: अभी नही तो कभी नही, राज ठाकरे ठाम; देशभरातील हिंदुंना पत्राद्वारे आवाहन?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 03:50 PM2022-05-03T15:50:18+5:302022-05-03T15:50:42+5:30

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अनाधिकृत भोंगे हटवावे या मागणीवर राज ठाकरे(Raj Thackeray) ठाम आहे.

Raj Thackeray; Appeal to Hindus across the country by letter over Loudspeakers on mosque | Raj Thackeray: अभी नही तो कभी नही, राज ठाकरे ठाम; देशभरातील हिंदुंना पत्राद्वारे आवाहन?

Raj Thackeray: अभी नही तो कभी नही, राज ठाकरे ठाम; देशभरातील हिंदुंना पत्राद्वारे आवाहन?

googlenewsNext

मुंबई – मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यात पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी ही भूमिका मांडली. त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभेत मनसेने ३ मे पर्यंत सरकारनं सर्व मौलवींशी चर्चा करून अनाधिकृत भोंगे हटवावे अन्यथा मशिदीसमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लावू असा अल्टीमेटम दिला आहे. मात्र सत्ताधारी महाविकास आघाडी नेत्यांनी देशभरात केंद्राने भोंगे हटवण्याबाबत नियमावली बनवावी अशी मागणी करत केंद्राकडे चेंडू टोलवला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अनाधिकृत भोंगे हटवावे या मागणीवर राज ठाकरे(Raj Thackeray) ठाम आहे. भोंगे हा सामाजिक विषय आहे हा धार्मिक विषय नाही. अभी नहीं तो कभी नही असं म्हणत राज ठाकरेंनी एकदाच काय ते होऊन जाऊद्या असा इशारा औरंगाबादच्या सभेत दिला. ४ मेपासून ऐकणार नाही असंही राज ठाकरे म्हणाले. मनसेच्या अल्टीमेटमला काही तास शिल्लक असताना राज्यात राजकीय हालचाली बैठका वाढल्या आहेत. शिवतीर्थ इथं मनसेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भोंगे हटवण्याबाबतच्या आंदोलनावर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे भोंगे हटावच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अभी नही तो कभी नही सांगत देशभरातील हिंदूंना राज ठाकरे पत्राद्वारे आवाहन करणार आहे. या पत्रकात राज ठाकरे भोंग्याविरोधातील भूमिका कशी योग्य आहे हे लोकांना मुद्द्यांसह पटवून देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राज ठाकरेंचे हे पत्र थोड्याच वेळात अधिकृतपणे पुढे येईल असंही म्हटलं जात आहे. हे वृत्त टीव्ही ९ नं दिले आहे.

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेत १२ अटींचे उल्लंघन केल्याने सभेचे आयोजक राजीव जावळीकर आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्तता यांनी सभेला १६ अटी घालून परवानगी दिली होती. सिटी चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११६, ११७, १५३ अ आणि मुंबई पोलीस कायदा अधिनियम १३५ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून अशोक गिरी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Web Title: Raj Thackeray; Appeal to Hindus across the country by letter over Loudspeakers on mosque

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.