Raj Thackeray: राज ठाकरेंनी सांगितलं आवडत्या अभिनेत्रीचं नाव; 'त्या' आता आहेत लोकसभेतील खासदार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 11:03 AM2023-03-22T11:03:58+5:302023-03-22T11:11:18+5:30
Raj Thackeray: गुढीपाडव्याच्या सभेआधी राज ठाकरेंनी लोकमान्य सेवा संघातर्फे शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित 'कलात्मक मनाचे कवडसे' या कार्यक्रमात मुलाखत दिली.
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची गुढीपाडव्याला मुंबईत सभा होत आहे. या सभेसाठी केलेला धर्म आणि मराठी या दोन विषयांवर वाहिलेला हा टिझर चांगलाच चर्चेत आला आहे. मुंबईत सभेची तयारी पूर्ण झाली आहे. गुढीपाडव्याला होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
गुढीपाडव्याच्या सभेआधी राज ठाकरेंनी लोकमान्य सेवा संघातर्फे शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित 'कलात्मक मनाचे कवडसे' या कार्यक्रमात मुलाखत दिली. राजकारणानेच सर्व गोष्टी ठरतात. त्यामुळे मध्यमवर्गाने राजकारणात यायला हवे. केवळ माझ्याच पक्षात या, असे मी म्हणणार नाही. तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही पक्षात जावे. मात्र राजकारणात या, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.
राज्यात सुरु असणाऱ्या विविध विषयांवर देखील त्यांनी भाष्य केलं. आताचे महाराष्ट्राचे राजकारण बघता, त्यात मी मिस फिट आहे, असे वाटते. आजच्यासारखी महाराष्ट्राची परिस्थिती मी कधीच पाहिली नाही. त्यामुळे या सगळ्याचा वीट आला आहे. ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले, त्यावर ही वेळ आली आहे. राज्यात २० वर्षांपूर्वी निकोप राजकारण होते. आता जे सुरु आहे ते वाईट आहे, असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.
राज ठाकरेंना या मुलाखतीत राजकारणाव्यतिरिक्त देखील प्रश्न विचारण्यात आले. राज ठाकरे यांची आवडती नटी कोण?, असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. यावर मला पूर्वीपासून आतापर्यंत साधारणपणे आवडलेली नटी म्हणजे फक्त हेमा मालिनी आहे. हेमा मालिनीच्या चेहऱ्यावर येवढं उत्तम पावित्र आहे, तेवढं मला वाटत नाही दुसऱ्या कोणत्या नटीच्या चेहऱ्यावर असेल. कदाचित हेमा मालिनी यांच्या आगमनानंतरच आपल्याकडची कॅरेक्टर बदलली असतील, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. दरम्यान हेमा मालिनी या सध्या लोकसभेतील खासदार आहेत.
दरम्यान, राज ठाकरेंची आज शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. टाळी एका हाताने वाजत नाही, किंवा आग लागल्याशिवाय धूर निघत नाही... या म्हणींची प्रचिती राज ठाकरे यांच्या भाषणातून येईल. तुम्ही चुका करायच्या. तुम्ही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचे. त्यांची विचारपूस करायची नाही, पक्ष सोडून लोक जाऊ लागले की आपल्या अपयशाचे खापर त्यांच्यावर फोडायचे. हे कसले राजकारण? असा सवाल किंवा अशी मांडणी राज ठाकरे यांच्याकडून केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थात राज ठाकरे यांच्या भाषणानंतर या तिघांची राजकीय खेळी कशी असेल याचे अंदाज बांधता येतील.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम