झोपड्या वसविणाऱ्या बिल्डरांना राजाश्रय - राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:55 AM2018-07-02T01:55:58+5:302018-07-02T01:58:50+5:30

मुंबईतील मोकळ्या जागांवर झोपडपट्टया वसवून बिल्डर लॉबीने मोक्याच्या जागा हडप केल्या. राजकीय वरदहस्तामुळेच बिल्डरांचा हा डाव यशस्वी झाला.

Raj Thackeray to build the huts of the huts - Raj Thackeray | झोपड्या वसविणाऱ्या बिल्डरांना राजाश्रय - राज ठाकरे

झोपड्या वसविणाऱ्या बिल्डरांना राजाश्रय - राज ठाकरे

Next

मुंबई : मुंबईतील मोकळ्या जागांवर झोपडपट्टया वसवून बिल्डर लॉबीने मोक्याच्या जागा हडप केल्या. राजकीय वरदहस्तामुळेच बिल्डरांचा हा डाव यशस्वी झाला. एकीकडे परप्रांतातून आलेल्यांना हक्काची घरे मिंळतात आणि मराठी माणसाला मात्र आपल्याच घरांसाठी धडपडावे लागत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केला.
मुंबईत वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीत राहणाºया कर्मचाºयांच्या घरांच्या प्रश्नाबाबत आयोजित कार्यक्रमात राज बोलत होते. वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील रहिवाशांना तिथेच घरे मिळायला हवीत असे सांगून राज म्हणाले की, वांद्रे पूर्व इथल्या शासकीय वसाहतीत राहणारा प्रत्येक मराठी माणूस इथेच राहील.
हिंमत असेल तर तुम्हाला काढून दाखवावे. तुम्ही जितकी वर्ष इथे काढलीत तशाच तुमच्या पुढच्या पिढ्या इथेच वाढणार, कोणतीही काळजी करू नका. तुम्हाला कोणीही धक्का लावणार नाही, असे राज यावेळी म्हणाले.
राज्यकर्त्यांच्या डोळ्यादेखत बेहरामपाड्यात चार-चार मजल्यांच्या झोपड्या उभ्या राहतात. तिथल्या मोहल्ल्यांमध्ये घुसायची यंत्रणांची आणि सत्ताधा-यांची हिंमत नाही. पण मराठी माणसाला नोटीसा पाठवल्या जातात, असेही राज म्हणाले.
गेल्या महिन्यात वांद्रे येथील शासकीय निवासस्थानात राहणाºया मंत्रालयातील कर्मचाºयाने आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली होती. आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते.
या घटनेमुळे सरकारी कर्मचारीही किती मानसिक ताणात असतात, याचे उदाहरण समोर आले आहे. कर्मचाºयांना मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी सरकारी स्तरावर उपाययोजनाही केल्या जाव्यात, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. त्यात राज यांनी कर्मचाºयांचे मनोबल वाढवण्याचे काम केले आहे.

- वांद्रे-कुर्ला संकुलातून बुलेट ट्रेन जातेय आणि तिथेच आता निवासी इमारती उभ्या राहणार आहेत. म्हणजे तिथे कोण येणार हे वेगळे सांगायला नको. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबई महाराष्ट्राला मिळाली.

- ही झालेली जखम भरून काढण्यासाठी बुलेट ट्रेन आणि मुंबई-बडोदा एक्स्प्रेस-वे केला जातोय, असा आरोप राज यांनी केला. गुजरात सरकारतर्फे एका संकेतस्थळाद्वारे ह्यगुजरात कार्डह्ण काढले जाते आहे.

- हे कार्ड राज्याबाहेरील गुजरात्यांसाठी आहे. ही त्यांची सोय का केली जातेय, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.

Web Title: Raj Thackeray to build the huts of the huts - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.