''देश आर्थिक गर्तेत चाललाय; पण मोदी भक्त सध्या आनंदात आहेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 01:17 PM2019-08-09T13:17:45+5:302019-08-09T13:18:07+5:30

देशाला पडत चाललेल्या मंदीच्या विळख्यावरून राज ठाकरेंनी मोदी-शहांना चांगलेच धारेवर धरले आहे.

raj thackeray comments on modi bhakt | ''देश आर्थिक गर्तेत चाललाय; पण मोदी भक्त सध्या आनंदात आहेत"

''देश आर्थिक गर्तेत चाललाय; पण मोदी भक्त सध्या आनंदात आहेत"

Next

मुंबईः देशाला पडत चाललेल्या मंदीच्या विळख्यावरून राज ठाकरेंनी मोदी-शहांना चांगलेच धारेवर धरले आहे. देश आर्थिक गर्तेत चालला आहे पण मोदी भक्तांचं लक्ष नाही, ते सध्या आनंदात आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यांच्यावर जेव्हा ह्या आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळेल तेव्हा त्यांना कळेल. ह्या आर्थिक अडचणींकडे लक्ष जाऊ नये म्हणून समान नागरिक कायदा, राम मंदिर मुद्दे पुढे आणून तुमचं लक्ष विचलित करायचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी मोदी सरकारवर केला आहे.
 
काल नरेंद्र मोदी म्हणाले की, 370 कलम काढल्यावर काश्मीरमध्ये रोजगार निर्माण करू, पण अनेक राज्यात भाजपाची सत्ता आहे, मग तिथे गेल्या 5 वर्षात रोजगार का निर्माण करू नाही शकलात? गेल्या 45 वर्षांतला बेरोजगारीचा आकडा सगळ्यात जास्त आहे. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात 14 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, जवळपास 6 लाख मध्यम उद्योग बंद पडलेत आणि हे सगळं एका माणसाला आलेल्या नोटाबंदीच्या झटक्यामुळे झालं. जीएसटी आणला पण केंद्राकडे पुरेसा निधी नाही, त्यामुळे महापालिकांना पैसा नाही, मग शहरं चालणार कशी ?, असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आहे. जेट एअरवेज बंद,  एअर इंडिया तोट्यात, बीएसएनएल 54 हजार कोटींचा तोटा, हिंदुस्थान एरोनॉटिक्स कामगारांचा पगार द्यायला पैसे नाहीत, देशाचं वाहन क्षेत्रं प्रचंड अडचणीत आहे. त्यामुळे किमान 10 लाख कुटुंब अडचणीत येणार आहेत. ओनजीसी तोट्यात, स्टेट बँक तोट्यात आहे. आपण रेल्वे भरतीसाठी 2008-09ला आंदोलन केलं तेव्हा आपल्यावर केसेस टाकल्या गेल्या, पण असंच आंदोलन गुजरातमध्ये झालं तेव्हा गुजरातमधून हाकलून दिलेले उत्तर प्रदेश, बिहारची लोक महाराष्ट्रात आली. आणि हे आंदोलन करणारा अल्पेश ठाकोर भाजपामध्ये प्रवेश करतो आणि आपल्यावर केसेस टाकतात. काश्मीरमध्ये 370 कलम हटवायचं म्हणून इंटरनेट बंद केलं गेलं, टीव्ही बंद केले गेले, कर्फ्यू लावला गेला. उद्या असंच महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ ह्यांच्याबाबतीत घडू शकतो आणि हे सगळं बहुमताच्या जोरावर घडतंय. वर्तमानपत्रात बातम्या आल्या की मला ईडीची नोटीस आली, मला अशी कोणतीही नोटीस आली नाही. मी पत्रकारांना म्हटलं की अशाच धमक्या तुमच्या मालकांना दिल्या जात आहेत आणि म्हणून तुमची कितीही इच्छा असली तरी तुम्ही सत्य मांडू शकत नाहीत. 371 मतदारसंघांमध्ये भाजपाने ईव्हीएमच्या जोरावर फेरफार केले गेले, पण ह्यावर कोणी बोलायला तयार नाही. राजकीय पक्ष प्रचार करणार, सभा घेणार, पैसे खर्च करणार आणि तरीही जर भाजपा ईव्हीएमच्या जोरावर मतदान हवं तसं फिरवणार असेल तर राजकीय पक्ष कशा निवडणूक लढवणार, असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. मी मध्यंतरी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यानंतर सोनिया गांधींची भेट घेतली, ममता बॅनर्जींची भेट घेतली, त्यात ईव्हीएम भाजप कशा पद्धतीने वापरत आहे हे ह्या दोन्ही नेत्यांना सांगितलं. त्यांनी देखील हा धोका मान्य केला. त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या मुद्द्यावर तुमच्या सोबत आहोत.

 

Web Title: raj thackeray comments on modi bhakt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.