Join us

एक मंत्री महिला नेत्याला...; सुप्रिया सुळेंवरील सत्तारांच्या वक्तव्याबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 8:33 PM

आज मुंबईतील गोरेगावमधील नेस्कोला येथे सायंकाळी मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे संबोधित केले.

मुंबई- आज मुंबईतील गोरेगावमधील नेस्कोला येथे सायंकाळी मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे संबोधित केले. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केल्या. तसेच गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना मंत्री अबुल सत्तार यांनी शिवीगाळ केली होता, यावरही बोलताना राज ठाकरे  यांनी मंत्री सत्तार यांचा समाचार घेतला. 

खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवीगाळ केली होती, यावर राज ठाकरे यांनी भाष्य केले.  "हल्ली कोणी काहीही बरळत आहे, राजकारणातला दर्जा खाली गेला आहे. राज्यातला एक मंत्री महाराष्ट्रातील एका महिला नेत्याला शिवागाळ करतो, एवढ्या खाली पातळी गेली , मी असा महाराष्ट्र कधी पाहिलेला नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर केली. 

 

'... तर पुन्हा मशिदीसमोर मोठ्या स्पीकरवर हनुमान चालिसा लावणार', राज ठाकरे कडाडले

निवडणुकीचे वातावरण नाही...

राज ठाकरे म्हणाले की, 'मला सध्या वातावरणात निवडणुका दिसत नाहीयेत. जानेवारीत लागेल, फेब्रुवारीत लागेल की, मार्चमध्ये लागेल, माहित नाही. या गटाला मान्यता मिळणार की, नाही मिळणार. नेमकं पुढे काय होणार, हे मला माहित नाहीये. पण, साधारण मार्चपर्यंत निवडणुका लागू शकतात,' असा दावा त्यांनी केला. 

मनसेच्या आंदोलनचा स्ट्राइक रेट सर्वाधिकराज ठाकरे पुढे म्हणाले की, 'आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन होऊन 16-17 वर्षे झाली. आजपर्यंत पक्ष म्हणून आपण जी आंदोलने केली, त्याचा स्ट्राइक रेट पाहिला, तर आपल्या आंदोलनांना इतर पक्षांपेक्षा सर्वाधिक यश मिळाले आहे. पण, काही यंत्रणा राबवल्या जातात, मनसेकडून जी-जी आंदोलने होत असतात, ती विस्मपणात कशा जातात, ते पाहिले जाते.' 

टॅग्स :राज ठाकरेमनसेसुप्रिया सुळे