"स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि..," राज ठाकरेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 07:31 PM2022-11-27T19:31:58+5:302022-11-27T20:19:49+5:30
'मुख्यमंत्री पदावर असताना तब्येतीचे कारण सांगून घरी बसले होते. आणि आता एकनाथ शिंदे यांनी रात्रित कांडी फिरवल्यामुळे सगळीकडे फिरत आहेत.'
मुंबई- मुख्यमंत्री पदावर असताना तब्येतीचे कारण सांगून घरी बसले होते. आणि आता एकनाथ शिंदे यांनी रात्रीत कांडी फिरवल्यामुळे सगळीकडे फिरत आहेत, हे लोक सत्तेसाठी कुणाचाही हात हातात घेतात, असा टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. आज मुंबईतील गोरेगावमधील नेस्कोला येथे सायंकाळी मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे संबोधित केले. यावेळी बोलताता राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
मे महिन्यात राज ठाकरे यांनी औरंगाबादला शेवटची सभा घेतली होती. त्यानंतर काहीच दिवसात राज्यातील महाविकास आघाडीच सरकार कोसळलं आणि राज्यांत नवं सरकार आलं. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर राज ठाकरेंचा हा पहिलीच मोठी सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे नेमकं कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्यावरही टीका केली. राजपाल तुम्ही गुजराती आणि मारवडींना विचारा तुम्ही महाराष्ट्रात का आले आहात. तुम्हाला तुमचं राज्य नव्हत का, असा प्रश्न देखीन त्यांनी केला.
भोंग्यावरुनही राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना आवाहन केले. ज्या ठिकाणी भोंगा बंद झाला नाही. त्या ठिकाणी ट्रकवर मोठा भोंगा लावावा, असंही राज ठाकरे म्हणाले.
निवडणुकीचे वातावरण नाही...
राज ठाकरे म्हणाले की, 'मला सध्या वातावरणात निवडणुका दिसत नाहीयेत. जानेवारीत लागेल, फेब्रुवारीत लागेल की, मार्चमध्ये लागेल, माहित नाही. या गटाला मान्यता मिळणार की, नाही मिळणार. नेमकं पुढे काय होणार, हे मला माहित नाहीये. पण, साधारण मार्चपर्यंत निवडणुका लागू शकतात,' असा दावा त्यांनी केला.
मनसेच्या आंदोलनचा स्ट्राइक रेट सर्वाधिक
राज ठाकरे पुढे म्हणाले की, 'आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन होऊन 16-17 वर्षे झाली. आजपर्यंत पक्ष म्हणून आपण जी आंदोलने केली, त्याचा स्ट्राइक रेट पाहिला, तर आपल्या आंदोलनांना इतर पक्षांपेक्षा सर्वाधिक यश मिळाले आहे. पण, काही यंत्रणा राबवल्या जातात, मनसेकडून जी-जी आंदोलने होत असतात, ती विस्मपणात कशा जातात, ते पाहिले जाते.'