Raj Thackeray ED Notice Live : अखेर राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर आले
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 08:26 AM2019-08-22T08:26:29+5:302019-08-22T20:17:00+5:30
Raj Thackeray's ED Inquiry Live Update
मुंबई - कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. तसेच ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांना उपस्थित न राहण्यासाठी नोटीस बजाविल्या आहेत.
LIVE
05:39 PM
राज ठाकरेंची गेल्या सहा तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गेल्या सहा तासांपासून ईडीकडून चौकशी सुरूच आहे. मनसैनिकांनी ईडीच्या कार्यालयाच्या परिसरात गर्दी केली असून राज यांचे कुटुंबीयही ग्रँड हॉटेलमध्ये सकाळपासून थांबून आहेत.
05:32 PM
उल्हासनगरात सरकारच्याविरोधात मनसे पदाधिकाऱ्यांचे आंदोलन; पोलिसांनी केली अटक
उल्हासनगरात सरकारच्याविरोधात मनसे पदाधिकाऱ्यांचे आंदोलन; पोलिसांनी केली अटक
04:14 PM
राज ठाकरे यांच्या आदेशामुळे नाशकात मनसैनिकांची शांतता
03:35 PM
कल्याणमध्ये बाजारपेठ बंद करण्यात आली
कल्याणातील काही मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची तर काही जणांना नजरकैदेत ठेवल्याची प्राथमिक माहिती. पश्चिमेतील बेतूरकर पाडा परिसरातील दुकानेही बंद करण्यात आली आहेत.
03:10 PM
राज ठाकरे तीन तासांपासून ईडी कार्यालयात, अद्याप चौकशी सुरूच!
02:52 PM
कौटुंबिक वात्सल्य आणि नाती हे आमचे संस्कार, 'त्या' ट्विटवरून मनसेचा दमानियांना टोला
कौटुंबिक वात्सल्य आणि नाती हे आमचे संस्कार, 'त्या' ट्विटवरून मनसेचा दमानियांना टोला @YKilledar@mnsadhikruthttps://t.co/ue3CVW3nRs
— Lokmat (@MiLOKMAT) August 22, 2019
02:52 PM
इंदिरा गांधींबाबतही हेच घडलं, ईडीवरुन आव्हाड म्हणाले
02:45 PM
'ईडीयट हिटलर'! ईडीच्या चौकशीवरून मनसेचा टोला!
निशान्यावर कोण
— Lokmat (@MiLOKMAT) August 22, 2019
https://t.co/K0dif3iQlQ
02:30 PM
राज ठाकरेंचे कुटुंबीय हॉटेलमधून बाहेर, ईडी चौकशी अद्याप सुरूच!
02:25 PM
राज ठाकरेंची चौकशी सात वाजेपर्यंत चालणार
मुंबई - ईडीकडून राज ठाकरेंची आजची चौकशी सात वाजेपर्यंत चालणार, तीन अधिकाऱ्यांकडून राज यांच्याकडे सविस्तर विचारणा, सूत्रांची माहिती
02:19 PM
गुन्हा केला नसेल तर चौकशीला निडरपणे सामोरे जावे - संजय राऊत
गुन्हा केला नसेल तर चौकशीला बेडरपणे सामोरे जावे - संजय राऊत https://t.co/fRlKG406WC
— Lokmat (@MiLOKMAT) August 22, 2019
02:07 PM
राज ठाकरेंच्या कुटुंबीयांच्या पाठिशी सुप्रिया'ताई', दमानियांच्या टिकेला प्रत्युत्तर
राज ठाकरेंच्या कुटुंबीयांच्या पाठिशी सुप्रिया'ताई', दमानियांच्या टिकेला प्रत्युत्तर https://t.co/JUdrRpvRn3
— Lokmat (@MiLOKMAT) August 22, 2019
01:43 PM
आईचा आशीर्वाद, 'दादू'च्या शुभेच्छा अन् 9 नंबरची कार राज ठाकरेंसाठी 'लकी' ठरणार?
शांतता... ईडी चौकशी चालू आहे! #RajThackeray@mnsadhikruthttps://t.co/AxlXLRyt6v
— Lokmat (@MiLOKMAT) August 22, 2019
01:37 PM
ठाणे मनसे पदाधिकारी महेश कदम यांना ताब्यात घेतले. महेश यांनी राज ठाकरे यांचा मुखवटा घालून आणि “होय मी राज भक्त” टीशर्ट घालून निषेध केला आहे.
01:22 PM
चौकशी पक्षाच्या प्रमुखाची नसून एका व्यवसायाची आहे - सुधीर मुनगंटीवार
चौकशी झाली म्हणजे आरोपी आहेच असे होत नाही. https://t.co/UyFrjmbBQ9
— Lokmat (@MiLOKMAT) August 22, 2019
01:11 PM
कळवा पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना घेतलं ताब्यात
ठाणे - ठाणे उपशहर अध्यक्ष सुशांत सुर्यराव, कळवा/मुंब्रा विधानसभा विभाग अध्यक्ष महेश साळवी, कळवा/मुंब्रा विधानसभा सचिव संजोग शिळकर, राज्य चिटणीस-जनहित कक्ष मोहनसिंह चौहान, विद्यार्थीसेना उपशहर अध्यक्ष दिपक शिंदे, प्रभाग अध्यक्ष राजेश शिळकर, प्रभाग अध्यक्ष स्वप्नील वाघोळे, प्रभाग अध्यक्ष दिलीप धुळे, मनोज कोनकर, गणेश रहाटे, अभिजित संमेळ, गजानन डोंगरे, राकेश पेडणेकर यांना कळवा पोलिसांनी घेतलं ताब्यात
12:55 PM
ठाणे शहर उपाध्यक्ष विश्वजित जाधव यांना देखील राबोडी पोलिसांनी घेतले ताब्यात
12:43 PM
सरकारने महाराष्ट्रात दडपशाही सुरू केली आहे - अविनाश जाधव
12:33 PM
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू
12:21 PM
मनसैनिकांचा नवा फंडा; 'टी-शर्ट मेसेज'मधून मोदी सरकारला हल्ला
Raj Thackeray ED Notice : मनसैनिकांचा नवा फंडा; 'टी-शर्ट मेसेज'मधून मोदी सरकारला हल्लाhttps://t.co/sxWn5zufEq#RajThackeray#Mumbai
— Lokmat (@MiLOKMAT) August 22, 2019
12:15 PM
'राज ठाकरे ईडी चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला?'
'राज ठाकरे ईडी चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला?' https://t.co/NOXAjJ9Icv
— Lokmat (@MiLOKMAT) August 22, 2019
11:56 AM
मुंबईतील काही भागांमध्ये जमावबंदीचा आदेश लागू
Mumbai Police: Section 144 of the Code of Criminal Procedure (CrPC) imposed in areas under Marine Drive, MRA Marg, Dadar, and Azad Maidan police stations. pic.twitter.com/DQWWzK2BgT
— ANI (@ANI) August 22, 2019
11:37 AM
मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस ठाणे, आझाद मैदान पोलीस ठाणे, दादर पोलीस ठाणे आणि मरीन ड्राईव्ह या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
11:34 AM
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडी कार्यालयात पोहोचले
11:27 AM
राज ठाकरे कृष्णकुंज येथून ईडी कार्यालयाकडे रवाना
11:19 AM
... तर शांत बसणार नाही, अविनाश जाधव यांचा सरकारला इशारा
Raj Thackeray ED Notice : ... तर शांत बसणार नाही, अविनाश जाधव यांचा सरकारला इशाराhttps://t.co/vq8LEhngfu#RajThackeray#Mumbai
— Lokmat (@MiLOKMAT) August 22, 2019
11:02 AM
मनसे वाहतूक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष आशिष डोके, मनसे ठाणे शहर सचिव रवींद्र सोनार, मनसे प्रभागध्यक्ष विनायक रणपिसे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
10:47 AM
सरकारला परिणाम भोगावे लागतील
राज साहेबांसोबत अनुचित प्रकार घडला तर सरकारला परिणाम भोगावे लागतील - अविनाश जाधव
10:37 AM
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब ईडी कार्यालयाकडे रवाना
#Mumbai: Maharashtra Navnirman Sena (MNS) Chief Raj Thackeray has been summoned by the Enforcement Directorate to appear before the agency, today. pic.twitter.com/Q7taHe21ZJ
— ANI (@ANI) August 22, 2019
10:32 AM
ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव देखील नौपाडा पोलिसांच्या ताब्यात
10:27 AM
मुंबई : राज ठाकरे सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार
10:27 AM
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि सुपुत्र अमित ठाकरे हे राज ठाकरे यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयात जाणार.
10:23 AM
ठाणे : मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांना कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
10:18 AM
मुंबई : ईडी कार्यालयाच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त.
09:53 AM
राज ठाकरे ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार, मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त
09:42 AM
मुंबई : सरकार आणि ईडीचा निषेध म्हणून संदीप देशपांडे यांनी काळ्या रंगाचं 'EDiot Hitler' लिहिलेलं टी-शर्ट परिधान केलं आहे.
09:34 AM
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात
Mumbai: Maharashtra NavNirman Sena (MNS) leader Sandeep Deshpande detained by police as a precautionary measure. MNS chief Raj Thackeray has been summoned by the Enforcement Directorate (ED) to appear before the agency, today. pic.twitter.com/4kIUATA6PK
— ANI (@ANI) August 22, 2019
09:18 AM
भाऊ झाला पाठीराखा; राज ठाकरेंच्या ईडी नोटीशीवर उद्धव ठाकरे बोलले!
भाऊ झाला पाठीराखा https://t.co/WU0pCOBHwj
— Lokmat (@MiLOKMAT) August 22, 2019
09:12 AM
मुंबई : मनसे पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू
मुंबई : मनसे पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात. https://t.co/CbvSFUjpi9#RajThackeray#mnspic.twitter.com/keYd9yoFL2
— Lokmat (@MiLOKMAT) August 22, 2019
09:03 AM
राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीमुळे मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ
राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीमुळे मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढhttps://t.co/IZGRdoYAbG#RajThackeray
— Lokmat (@MiLOKMAT) August 22, 2019
08:54 AM
मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त
मुंबई : कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त, कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त
08:44 AM
मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी धाडल्या नोटीस
मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी धाडल्या नोटीस @mumbaipolicehttps://t.co/RkAmPF8pfq
— Lokmat (@MiLOKMAT) August 21, 2019
08:35 AM
कार्यकर्त्यांनो, कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका; राज ठाकरेंनी केली कळकळीची विनंती
कार्यकर्त्यांनो, कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका; राज ठाकरेंनी केली कळकळीची विनंती @RajThackeray@mnsadhikrut
— Lokmat (@MiLOKMAT) August 21, 2019
https://t.co/5xstwaEvn9
08:27 AM
राज ठाकरे आज जाणार ईडीच्या चौकशीला सामोरे
राज ठाकरे आज जाणार ईडीच्या चौकशीला सामोरे https://t.co/E49qU1MX1X
— Lokmat (@MiLOKMAT) August 22, 2019