'राज ठाकरे ईडी चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला?'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 11:40 AM2019-08-22T11:40:36+5:302019-08-22T11:41:44+5:30
कोहिनूर मील व्यवहार प्रकरणी होणाऱ्या चौकशीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.
मुंबई - कोहिनूर मील व्यवहार प्रकरणी होणाऱ्या चौकशीसाठी मनसेप्रमुखराज ठाकरे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, चौकशीसाठी निघालेल्या राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यसुद्धा आहेत. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला? असा सवाल दमानिया यांनी केला आहे.
सहकुटुंब ईडीच्या कार्यालयाकडे निघालेल्या राज ठाकरेंना अंजली दमानिया यांनी ट्विटरवरून सवाल विचारला आहे. ''राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा? की सहानूभुती गोळा करण्याचा हा प्रयत्न.'' असे ट्विट दमानिया यांनी केले आहे.
राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा drama? का सहनुभी गोळा करण्याचा हा प्रयत्न
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) August 22, 2019
दरम्यान, राज ठाकरे काही वेळापूर्वीच ईडीच्या कार्यालयात दाखल झाले असून, त्यांची पत्नी, मुलगा आणि सून यांना कार्यालयाबाहेर थांबवण्यात आले आहे. पुढच्या काही वेळातच ईडीच्या अधिकाऱ्यांकडून राज ठाकरे यांची चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे.