Join us

या मुद्द्यावर कोणीही बोलू नका; राज ठाकरेंनी मनसे प्रवक्त्यांना दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 12:58 PM

' हर हर महादेव' चित्रपटावरुन आता वाद  सुरू आहे. यावरुन आता मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. यावरुन आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. 

मुंबई- ' हर हर महादेव' चित्रपटावरुन आता वाद  सुरू आहे. यावरुन आता मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. यावरुन आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.  हर हर महादेव' या चित्रपटावर कोणीही भाष्य करू नये, अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या प्रवक्त्यांना दिल्या आहेत. या प्रकरणाला राष्ट्रवादी काँग्रेस जातीय रंग देत असून सध्या या विषयावर बोलू नये, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे. 

'हर हर महादेव' चित्रपटातून इतिहास नष्ट केला जात असल्याचा आरोप माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी केला होता. यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. याविरोधात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निषेध केला.

तेच शहर अन् तेच ठिकाण! अविनाश जाधव आज 'हर हर महादेव' चित्रपट मोफत दाखवणार; राजकारण तापणार

ठाण्यातील एका मॉलमध्ये चित्रपट प्रदर्शित सुरू होता येवेळी आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. या आंदोलनानंतर चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी या घटनेचा निषेध करत ‘खरी शिवभक्ती काय आहे ते राज ठाकरेंकडून शिका’ असा सल्ला दिला. या मॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी एका प्रेक्षकालाही मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.

दरम्यान,  मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी ५ मिनिटांत विवियाना मॉल गाठत हर हर महादेव हा चित्रपट पुन्हा सुरु करण्याची मागणी केली.

अविनाश जाधव यांच्या आक्रमक भूमिकेमुळे 'हर हर महादेव' हा चित्रपट विवियाना मॉलमध्ये पुन्हा सुरु करण्यात आला. अविनाश जाधव यांनी यावेळी स्वत: चित्रपटगृहात बसून संपूर्ण चित्रपट पाहिला. तसेच मी चित्रपट पाहतोय. माझ्यासह अनेक प्रेक्षक देखील उपस्थित आहे. त्यामुळे चित्रपट बंद करुन दाखवाच, असा इशाराही अविनाश जाधव यांनी यावेळी दिला. हा सर्व प्रकार सोमवारी रात्री घडला. त्यानंतर आज अविनाश जाधव यांनी मोठी घोषणा केली आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसे