Raj Thackeray: लॉकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थीती सध्या झाली आहे. त्यामुळेच दुसरी लाट, तिसरी लाट आणि चौथी लाट अशी भीती घातली जातेय, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर केला आहे. ते मुंबईत 'कृष्णकुंज'वर पत्रकार परिषदेत बोलत होते. कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या विरोधाला न जुमानता आज ठिकठिकाणी मनसैनिकांनी दहीहंडी साजरी केली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
"जनआशीर्वाद यात्रा चालते. पण सण साजरं करायला बंदी. कोरोना काय फक्त सणांमध्ये पसरतो का? राजकीय यात्रांमध्ये कोरोना होत नाही का? तिथं भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात प्रवेश करुन अभिषेक केला. केली मग सत्ताधाऱ्यांसाठी नियम वेगळे आहेत का? आम्ही दहीहंडी फोडायची नाही का?", असे सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.
'ते' घराबाहेर पडत नाहीत त्याला आम्ही काय करणार?राज्यात सर्व कामं व्यवस्थित सुरू आहेत. महापौर बंगल्यावर रोज बिल्डरांची वाहनं येताना दिसतात. लोकांना कोरोनाचं कारण देऊन फक्त भीती घालण्याचं काम सुरू आहे. जनआशीर्वाद यात्रा चालते. पण सण साजरे करायला बंदी. कोरोना काय फक्त सणांमध्ये पसरतो का? राजकीय यात्रांमध्ये कोरोना होत नाही का? लोकांना कोरोनाचं कारण देऊन फक्त भीती घालण्याचं काम सुरू आहे. फक्त 'ते' घराबाहेर पडत नाहीत त्याला आम्ही काय करणार?, असा टोला राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे:
>> थर लावू नका मग काय खुर्चीवर उभं राहून दहिहंडी फोडायची का?, राज ठाकरे यांचा राज्य सरकारला टोला
>> लॉकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थीती सध्या झालीय. त्यामुळे दुसरी लाट, तिसरी लाट, चौथी लाट हे असं मुद्दाम आणलं जातंय
>> भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला. मग सरकारसाठी सारं उघडं आहे का?
>> महापौर बंगल्यावर येणाऱ्या बिल्डरांच्या गाड्या काही कमी झालेल्या दिसत नाहीत.
>> जोरात दहीहंडी साजरी करा. जे होईल ते होईल असं मी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं.
>> जनआशीर्वाद यात्रा चालली, तेव्हा लॉकडाऊन नाही. सण आला की लॉकडाऊन, सणांनीच कोरोना पसरतो. राजकीय यात्रांनी पसरत नाही का?
>> जनतेला घाबरुन ठेवण्याचं काम सरकार करतंय.
>> अंगावर केस किती आहेत हे जसं आपण मोजत नाही. तसं आम्ही आमच्या अंगावर किती केसेस पडल्यात ते मोजत नाही.
>> मंदिरं उघडली गेलीच पाहिजेत. नाहीतर सगळ्या मंदिरांबाहेर घंटानाद करू
>> शिवसेना आज विरोधात असती तर काय केलं असतं? त्यांही हे सांगावं