Raj Thackeray: मुंबईत मनसेचे बॅनर झळकल्याने नवा वाद, उद्धव ठाकरेंनाच केलं लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 09:44 AM2022-04-06T09:44:25+5:302022-04-06T09:45:19+5:30

मुंबईतील दादर-माहिम-प्रभादेवी विधानसभा मतदारसंघात हा बॅनर झळकला असून या बॅनरवरुन शिवसेनेला टार्गेट करण्यात आलं आहे

Raj Thackeray: MNS banner flashed in Mumbai, targeting new controversy, Uddhav Thackeray | Raj Thackeray: मुंबईत मनसेचे बॅनर झळकल्याने नवा वाद, उद्धव ठाकरेंनाच केलं लक्ष्य

Raj Thackeray: मुंबईत मनसेचे बॅनर झळकल्याने नवा वाद, उद्धव ठाकरेंनाच केलं लक्ष्य

googlenewsNext

मुंबई - गुढी पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जहाल हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत थेट मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत इशारा दिला होता. मशिदीवरील भोंगे सरकारने हटवावे अन्यथा आम्ही भोंग्यासमोर दुपटीने लाऊडस्पीकर लावत हनुमान चालीसा लावू असं राज ठाकरेंनी म्हटलं होते. राज ठाकरेंच्या या सभेनंतर त्यांच्यावर सत्ताधारी पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चौफेर हल्ला चढवला. तर, पक्षातील काही पदाधिकारीही नाराज झाले आहेत. त्यातच, आता मुंबईत मनसैनिकांनी झळकवलेला एका बॅनर लक्षवेधी ठरत आहे.

मुंबईतील दादर-माहिम-प्रभादेवी विधानसभा मतदारसंघात हा बॅनर झळकला असून या बॅनरवरुन शिवसेनेला टार्गेट करण्यात आलं आहे. स्वर्गीय बाळासाहेबांना उद्देशून हा बॅनर लिहिला असून उद्धव ठाकरेंवरी टीका करण्यात आली आहे. 
माननीय बाळासाहेब, 
बघा आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदू असून हनुमान चालिसा म्हणायला बंदी घालत आहेत. हिंदूंनी लावलेले भोंगे काढत आहेत. आपला ठाकरी बाणा आणि वारसा खऱ्या अर्थाने फक्त राजसाहेब ठाकरेच चालवत आहेत. जमल्यास उद्धवजींना हिंदूबाबत सद्बुद्धी द्या.. 

अशा आशयाचे बॅनेर दादरमध्ये झळकल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान, शिवतीर्थावरील भाषणात राज ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्व दाखवत मशीद, भोंगे आणि मदरशांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. इतकेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावर थेट जातीयवादाचे आरोप केले होते.

मनसेच्या भूमिकेवर मुस्लीम नाराज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांच्या या भूमिकेवर पक्षातील मुस्लीम पदाधिकाऱ्यांनीच नाराजी व्यक्त केली. पुण्यातील काही मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले. तर पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही राज ठाकरेंच्या या भूमिकेवरून राजकीय अडचण होत असल्याचं म्हटलं. 

गैरसमज दूर करण्यासाठी पुन्हा सभा

सत्ताधाऱ्यांचे आरोप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ९ एप्रिलला ठाण्यात जाहीर सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील गडकरी रंगायतनच्या समोरील रोडवर ही सभा होणार असून यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सभेसंदर्भात सूचना दिल्या आहेत. 
 

Read in English

Web Title: Raj Thackeray: MNS banner flashed in Mumbai, targeting new controversy, Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.