मुंबई-
मनसे आणि भाजपाची वाढती जवळीक पाहता आगामी पालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये युतीचे वारे वाहू लागले होते. दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत चर्चा होत असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. पण या सर्व चर्चांना अखेर आज पूर्णविराम मिळाला आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसेने पुन्हा एकदा 'एकला चलो रे' चा नारा दिला आहे. मुंबईत मनसे सर्व जागांवर म्हणजेच २२७ जागांवर उमेदवार देणार असल्याचं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. मुंबईसोबतच इतरही सर्व महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.
राज ठाकरे १८ पासून विदर्भात; सेनेची जागा घेण्याचे मनसेचे मनसुबे
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर राज ठाकरे आणि सरकारमधील जवळीक वाढल्याचं दिसून आलं. मग भाजपा नेत्यांची शिवतीर्थवारी असो किंवा मग राज ठाकरेंनी सहकुटुंब मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी भेट देऊन गणपतीचं दर्शन घेणं असो. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी मनसे आणि भाजपा युती होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत होती. पण या सर्व शक्यता आता संदीप देशपांडे यांनी फेटाळून लावल्या आहेत.
“सखोल चौकशी व्हावी, राज्यातून गुंतवणूकीचा उलटा प्रवास सुरू होणं चांगलं लक्षण नाही”
"राज ठाकरेंचे आदेश आम्हाला मिळाले असून पालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. स्वबळावर लढण्याचा निर्धार आम्ही केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे सर्व २२७ जागांवर उमेदवार देईल", असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
'ट्रेनला काही डबे जोडण्याचं काम सुरुय', राज ठाकरेंचं विदर्भ दौऱ्याआधी सूचक विधान!
राज ठाकरे १७ सप्टेंबरपासून विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याआधी मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी एक सूचक विधान केलं होतं. सध्या रेल्वेची जुळवाजूळव करतोय. काही डबे मागवलेत, असं मिश्किल विधान राज ठाकरेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केलं. पण राज यांच्या याविधानाचा रोख भाजपासोबतच्या युतीबाबत तर नाही ना? असा सवाल आता उपस्थित केला जात होता. अखेर संदीप देशपांडे यांनी यावर स्पष्टीकरण देत निवडणूकपूर्व युतीबाबत्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पण मनसे आणि भाजपाची वाढलेली जवळीक पाहता निवडणूकपूर्व युती होणार नसली तरी आगामी काळात निवडणूक निकालानंतर युती होणार नाही असं आत्ताच ठामपणे सांगता येणार नाही.