Raj Thackeray: निवडणुकीपूर्वी मनसेचं 'हिंदुत्व कार्ड'; राज ठाकरेंचा 'हिंदुह्दयसम्राट' उल्लेख असणारे बॅनर्स झळकले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 02:03 PM2022-02-14T14:03:09+5:302022-02-14T14:05:51+5:30

मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याने हिंदुह्रदयसम्राट असा उल्लेख केला आहे. घाटकोपरमध्ये लावण्यात आलेल्या या बॅनरची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे

Raj Thackeray: MNS's 'Hindutva Card' before elections; Banners with Raj Thackeray's 'he' flashed hinduhrudaysamrat in mumbai | Raj Thackeray: निवडणुकीपूर्वी मनसेचं 'हिंदुत्व कार्ड'; राज ठाकरेंचा 'हिंदुह्दयसम्राट' उल्लेख असणारे बॅनर्स झळकले

Raj Thackeray: निवडणुकीपूर्वी मनसेचं 'हिंदुत्व कार्ड'; राज ठाकरेंचा 'हिंदुह्दयसम्राट' उल्लेख असणारे बॅनर्स झळकले

Next

मुंबई - मनसेनं आपला झेंडा बदलल्यानंतर अनेकांनी राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी मुद्द्याकडे लक्ष वेधले. राज ठाकरे हिंदुत्वावादाचा मुद्दा घेऊन आता राजकीय वाटचाल करत असल्याचं अनेकांनी म्हटलं. त्यातच, शिवसेनेनं महाविकास आघाडीत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेना हिंदुत्त्वापासून दूर गेल्याची टिका सातत्याने भाजपाकडून होत आहे. दुसरीकडे भाजप आणि मनसेत जवळीकता वाढताना दिसून आली. त्यातच, महापालिका निवडणुकांपूर्वीच मुंबईत झळलेला राज ठाकरेंचा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याने हिंदुह्रदयसम्राट असा उल्लेख केला आहे. घाटकोपरमध्ये लावण्यात आलेल्या या बॅनरची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. राज ठाकरे घाटकोपरमध्ये एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तेथे हा बॅनर लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंचा उल्लेख या बॅनरवर हिंदू ह्रदयसम्राट असा करण्यात आला आहे. यापूर्वी राज यांचा उल्लेख मराठी ह्रदयसम्राट असा केला जात होता. आता, हिंदू ह्रदयसम्राट अशी उपमा राज ठाकरेंना मनसैनिकांनी दिल्याने चांगलीच चर्चा होत आहे. कारण, यापूर्वी महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांनाच हिंदू ह्रदसम्राट असे म्हटले जात.

बाळासाहेबांच्यानंतर शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे आली. त्यामुळे, राज ठाकरेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तरीही, बाळासाहेंबाच्या विचारांचे खरे वारसदार हे राज ठाकरेच असल्याचं मनसैनिकांकडून सांगण्यात येतं. विशेष म्हणजे राज यांच्या देहबोलीत, भाषणातही ती लकब दिसून येते. त्यामुळेच, मनसैनिकांनी बाळासाहेंबाची उपाधी राज यांना दिल्याचं दिसून येत आहे.  
 

Web Title: Raj Thackeray: MNS's 'Hindutva Card' before elections; Banners with Raj Thackeray's 'he' flashed hinduhrudaysamrat in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.