Join us

नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 10:01 AM

92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात' नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीवरून सुरू असलेल्या वादंगाविषयी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने' ने अधिकृत भूमिका मांडली आहे. 

ठळक मुद्देप्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केले आहे. '92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात' नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीवरून सुरू असलेल्या वादंगाविषयी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने' ने अधिकृत भूमिका मांडली आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीटरवर पक्षाची अधिकृत भूमिका असलेलं एक पत्र पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. 

मुंबई - प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केले आहे. '92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात' नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीवरून सुरू असलेल्या वादंगाविषयी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने' ने अधिकृत भूमिका मांडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीटरवर पक्षाची अधिकृत भूमिका असलेलं एक पत्र पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. 

'मराठी संस्कृतीची जी महत्त्वाची शक्तिस्थळं आहेत, त्यात मराठी साहित्य हे महत्त्वाचे शक्तिस्थळ आहे. एखाद्या भाषेतील साहित्याचा उत्सव साजरा करण्यासाठी त्यावर मंथन करण्यासाठी साहित्य संमेलन न चुकता भरवण्याची परंपरा बहुदा फक्त महाराष्ट्रातच असावी' असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखिकेला का बोलावले, असा आक्षेप नोंदवत काही स्थानिक संघटनांनी संमेलन उधळण्याचा इशारा दिला होता. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचाही यात समावेश होता. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन भूमिका स्पष्ट केली आहे.

देशातील सध्याच्या परिस्थितीची प्रत्येकाला लाज वाटायला हवी- नयनतारा सहगल

नयनतारा सहगल यांना संमेलनात येऊ न देणे चुकीचे

नयनतारा सहगल यांच्या सारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर जर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल आणि त्या जर ही परंपरा जगासमोर नेण्याच्या प्रक्रियेत एक वाहक असतील तर मला अथवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचे कारणच नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही, त्यांनी जरुर यावं, आम्ही त्याचं मनापासून स्वागत करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :राज ठाकरेमनसे