Join us

Raj Thackeray : राज ठाकरेंना मानसोपचाराची गरज, माजी पोलीस अधिकाऱ्याची फेसबुकवर पोस्ट

By पूनम अपराज | Published: May 12, 2022 6:20 PM

Raj Thackeray needs psychiatric treatment : या पोस्टसह राज ठाकरे यांचं मोदींवर टीका करणाऱ्या भाषणाचा व्हिडीओ देखील पोस्ट करण्यात आला आहे.  

पूनम अपराज

मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे ५ जूनला अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. मशिदीवरील भोंग्यांना विरोध करत राज यांनी आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. राज यांच्या भूमिकेचं राज्यातील भाजपच्या नेत्यांनी स्वागत केलं. मात्र राज यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदारानं विरोध केला आहे. राज यांना अयोध्येत पाऊलही टाकू देणार नाही, असा स्पष्ट इशारा भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी दिला आहे. त्यानंतर आता मुंबई भाजपमधूनही राज यांच्याविरोधात सूर उमटू लागले आहेत. तसेच अवामी विकास आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष समशेर खान पठाण यांनी देखील फेसबुकवर पोस्ट करत राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. 

समशेर खान पठाण हे माजी पोलीस अधिकारी असून त्यांनी १ मे २०१२ रोजी स्वतःच्या पक्षाची स्थापना केली. पठाण यांनी अवामी विकास आघाडी नावाचा पक्ष स्थापन केला. समशेर पठाण यांनी आता राज ठाकरे यांना आपला निशाणा साधत ये देखो डबल ढोलकी भंगार इंजिन, नाऊ अब्युजिंग पीएम, ये येडा हो गया, ही नीड्स सायकॅट्रिक ट्रीटमेंट अशी पोस्ट फेसबुकवर केली आहे. या पोस्टसह राज ठाकरे यांचं मोदींवर टीका करणाऱ्या भाषणाचा व्हिडीओ देखील पोस्ट करण्यात आला आहे.  

भाषणामध्ये सांगणार नरेंद्र मोदी पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. कोणतं उत्तर? हेच नरेंद्र मोदी कार्यक्रम पत्रिकेमध्ये नसताना, विमानातनं जात असताना आठवलं नवाज शरीफांचा वाढदिवस आहे. विमान लाहोर की कुठेतरी पाकिस्तानला उतरवलं आणि नवाज शरीफांकडून केक कापला. केक दोघांनी एकमेकांनी खाल्ला आणि जेवले हे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मग इथे येऊन सांगयतेय पाकिस्तान शत्रू आहे म्हणून अशी टीका राज ठाकरे यांनी आपल्या एका भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली होती. त्याचा व्हिडीओ फेसबुकला शेअर करत समशेर पठाण यांनी राज ठाकरे डबल ढोलकी असल्याचं म्हणत आता पंतप्रधानांचा अपमान केला आहे. राज ठाकरे यांना मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचाराची गरज असल्याची पोस्ट या व्हिडिओसोबत पठाण यांनी केली आहे. 

टॅग्स :राज ठाकरेपोलिसफेसबुकभाजपा