Raj Thackeray: हिंदी नको... दूरदर्शन सह्याद्रीवर मराठीच कार्यक्रम प्रसारित करा, मनसेचं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 07:51 PM2022-07-20T19:51:19+5:302022-07-20T19:52:29+5:30

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित न करता महाराष्ट्राची राजभाषा

Raj Thackeray: No Hindi... Broadcast only Marathi programs on Doordarshan Sahyadri, MNS Raj Thackeray demand at doordarshan | Raj Thackeray: हिंदी नको... दूरदर्शन सह्याद्रीवर मराठीच कार्यक्रम प्रसारित करा, मनसेचं पत्र

Raj Thackeray: हिंदी नको... दूरदर्शन सह्याद्रीवर मराठीच कार्यक्रम प्रसारित करा, मनसेचं पत्र

googlenewsNext

मुंबई - महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी, मराठी तरुणांसाठी आणि मराठी कलाकारांसाठी नेहमीच आग्रही भूमिका घेणाऱ्या मनसेनं आता पुन्हा एकदा मराठी बाणा दाखवला आहे. दोन महिन्यांपूर्वी आपल्या भोंगा आंदोलनाने रान पेटवणाऱ्या मनसेनं आता दूरदर्शनच्या सह्याद्री मराठी वाहिनीकडे आपला मोर्चा वळवला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दूरदर्शन पश्चिमचे अप्पर महासंचालक नितीन अग्रवाल यांना पत्र लिहिलं आहे. त्यात, मराठी भाषेतील कार्यक्रमासंबंधित मागणी करण्यात आली आहे. 

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित न करता महाराष्ट्राची राजभाषा- मराठीतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. राज ठाकरेंचे हे पत्र पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संजय चित्रे यांनी आज दूरदर्शनचे अप्पर महासंचालक नीरज अग्रवाल यांची 'प्रसारण भवन' येथे भेट घेऊन दिले आणि यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.


मराठी तरुणांना नोकरीत प्राधान्य देण्याची मागणी करत मनसेनं पहिलं मराठी आंदोलन छेडलं होतं. त्यावेळी, मराठी ही शिवसेनेचीच भूमिका असून शिवसेनेला कॉपी करण्याचा प्रयत्न होत असल्याची टिका शिवसेनेकडून मनसेवर करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही आपला मराठी बाणा कायम ठेवत मनसेनं अमेझॉन वेबसाईटवर मराठी, दुकानांना मराठी पाट्या यांसारखे मुद्दे घेऊन भूमिका मांडली होती. तर, मराठी कलाकारांसाठीही मनसे सातत्यने आग्रही असते. त्यासाठी, मनसेनं स्वतंत्र चित्रपटसेनेचीही स्थापना केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसेनं हिंदुत्त्वाची भूमिका घेतल्याचं दिसून येतं. राज ठाकरे यांनी अयोध्या दौराही आयोजित केला होता. मात्र, त्यांच्या आजारपणाचं कारण देत हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. 
 

Web Title: Raj Thackeray: No Hindi... Broadcast only Marathi programs on Doordarshan Sahyadri, MNS Raj Thackeray demand at doordarshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.