जागतिक व्यंगचित्रकार दिन: राज ठाकरेंनी व्यंगचित्रकरांना दिली मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 05:27 PM2018-05-05T17:27:01+5:302018-05-05T17:27:01+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रकारांना मानवंदना दिली आहे.
मुंबई- आज जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे. यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रकारांना मानवंदना दिली आहे.
वॉल्ट डिस्ने, बाळासाहेब ठाकरे, डेव्हिड लो, श्रीकांत ठाकरे, आर.के. लक्ष्मण, मॉर्ट ड्रकर, जॅक डेव्हिस या महान व्यंगचित्रकारांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मानवंदना दिली आहे. यासर्व व्यंगचित्रकारांचा फोटो राज ठाकरे यांनी ट्विट केला आहे. आज जागतिक व्यंगचित्रकार दिन. माझ्यातला व्यंगचित्रकार घडवणाऱ्या वॉल्ट डिस्ने, बाळासाहेब ठाकरे, डेव्हिड लो, श्रीकांत ठाकरे, आर.के. लक्ष्मण, मॉर्ट ड्रकर, जॅक डेव्हिस या महान व्यंगचित्रकारांना विनम्र अभिवादन, असं राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.
राज ठाकरे स्वतः एक व्यंगचित्रकार आहेत. म्हणूनच आज जागतिक व्यंगचित्रकार दिनाच्या निमित्ताने राज ठाकरेंनी त्यांच्यातील व्यंगचित्रकार घडविणाऱ्या महान व्यंगचित्रकारांना अभिवादन केलं आहे. वॉल्ट डिस्नी हे त्यांचे प्रेरणास्थान आहे, असं राज ठाकरेंनी अनेकदा सांगितलं आहे. राजकारणात नसते तर नक्कीच वॉल्ट डिस्नेसारखे कार्टूनपट करणे आवडले असतं असंही राज ठाकरे यांनी अनेकदा म्हटलं आहे.
Today is the World Cartoonist Day.
— Raj Thackeray (@RajThackeray) May 5, 2018
I salute and offer my heartfelt tribute to all these greats who were responsible in awakening the artist in me; Walt Disney, Balasaheb Thackeray, David Low, Shrikant Thackeray, R.K. Laxman, Mort Drucker, Jack Davis. #WorldCartoonistdaypic.twitter.com/oa4xSmGTo4
राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियावर एन्ट्री केली. राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून ते विविध मुद्द्यांवर मत मांडताना दिसतात. सामाजिक व राजकीय घडामोडींवर राज ठाकरे व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका करतात. राज ठाकरेंची व्यंगचित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतं.