राज ठाकरेंचं थेट 'शिवतीर्थ'मधून 'लाव रे तो व्हिडिओ'; सत्ताधाऱ्यांच्या 'टोल'वाटोलवीची पोलखोल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 11:50 AM2023-10-09T11:50:16+5:302023-10-09T11:52:57+5:30

जर सरकारला सोडवता येत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू, असा इशारा देखील राज ठाकरेंनी सरकारला दिला आहे. 

Raj Thackeray showed a clip of political leaders who made a statement about toll-free Maharashtra on the screen and criticized it | राज ठाकरेंचं थेट 'शिवतीर्थ'मधून 'लाव रे तो व्हिडिओ'; सत्ताधाऱ्यांच्या 'टोल'वाटोलवीची पोलखोल!

राज ठाकरेंचं थेट 'शिवतीर्थ'मधून 'लाव रे तो व्हिडिओ'; सत्ताधाऱ्यांच्या 'टोल'वाटोलवीची पोलखोल!

googlenewsNext

मुंबई: टोलच्या पैशांचं काय होतं, त्याच त्याच कंपन्यांना कंत्राटं कशी मिळतात?, असा सवाल मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांनी आज पुन्हा शिवतीर्थ या निवास्थानी पत्रकार परिषद घेत टोलच्या मुद्द्यांवरुन निशाणा साधला. यावेळी राज ठाकरेंनी एका स्क्रीनवर देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे, गोपिनाथ मुंडे यांनी टोलमुक्त महाराष्ट्रावर केलेल्या विधानाची क्लिप देखील दाखवली. 

उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, गोपीनाथ मुंडे अशा अनेक राजकीय नेत्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू अशी आश्वासनं दिली. पण तरीही टोल बंद होत नाही कारण ह्यात प्रत्येकाचं अर्थकारण सामील आहे. त्यामुळे रस्ते कितीही खराब असले तरीही हे सगळे राजकीय पक्ष कधीच टोल बंद होऊ देणार नाहीत. पण ह्यावर लोकं कधी ह्यावर जागृत होणार?, असं राज ठाकरे म्हणाले. 

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही टोलमुक्त महाराष्ट्राची, अशी विधानं केली. मात्र टोल हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा स्कॅम आहे. महाराष्ट्रातील या सगळ्यात मोठ्या स्कॅमची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. टोल घेत आहात, मग रस्ते चांगले का नाही?, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. टोलचा विषय, रस्त्यातील खड्ड्यांचा विषय हा काश्मिरइतका किचकट विषय आहे का? हा विषय इतकी वर्ष का सुटत नाही? रस्त्यातील खड्डे भरण्याची अवाढव्य रकमेची टेंडर्स कशी निघू शकतात? खड्डे भरण्याची टेंडर्स आपल्याकडेच निघतात. बाकी कुठेच घडत नाही. आणि हा विषय जर सरकारला सोडवता येत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू, असा इशारा देखील राज ठाकरेंनी सरकारला दिला आहे. 

देवेंद्र फडणवीस काल म्हणाले की, राज्यात दुचाकी, तीन चाकी आणि किंवा चारचाकी वाहनांना टोल माफ आहेत. मग आजपर्यंत टोलच्या नावाखाली जमा होणारी रक्कम कुठे जमा होत आहे? एकतर राज्य सरकार खोटं बोलत आहेत किंवा टोल कंपन्या लूट करत आहेत, असा आरोप राज ठाकरेंनी केला. मी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आणि त्यांना सांगणार आहे की देवेंद्र फडणवीस म्हणालेत तसं दुचाकी तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना टोल माफ करा, आणि इतके दिवस जे पैसे गोळा झालेत तर ते कुठे गेले? आणि इतकं होऊन पण जर टोल वसूल केला जाणार असेल तर माझे महाराष्ट्र सैनिक टोल नाक्यांवर उभे राहून वाहनांना सोडायला लावेल. आणि तरीही जर संघर्ष झाला तर आम्ही टोलनाके जाळून टाकू. मग जे होईल ते होईल, असा इशाराच राज ठाकरेंनी यावेळी दिला. 

Web Title: Raj Thackeray showed a clip of political leaders who made a statement about toll-free Maharashtra on the screen and criticized it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.