Raj Thackeray: सॉरी, मला आज कोणाचा मूड खराब करायचा नाही; सुजात आंबडेकरांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 03:47 PM2022-04-14T15:47:27+5:302022-04-14T15:49:15+5:30
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भोंगा काढण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे, तुम्ही काय सांगाल, असा प्रश्न सुजात आंबेडकर यांना विचारण्यात आला होता.
मुंबई - देशातील जनतेला, महाराष्ट्रातील जनतेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. लॉकडाऊननंतर, आयसोलेशननंतर, बाहेर पडून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्याची संधी लोकांना मिळाली आहे. लोकं एकत्र येऊन यंदा जयंती साजरी होत आहे, त्यामुळे सर्वांना शुभेच्छा असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी, राज ठाकरेंसदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी, मला आज कोणाचा मूड खराब करायच नाही, सॉरी... असे म्हणत उत्तर टाळले.
मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी भोंगा काढण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे, तुम्ही काय सांगाल, असा प्रश्न सुजात आंबेडकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर, आज आंबेडकर जयंतीचा दिवस आहे, मला नसत्या विषयांवर बोलायचं नाहीये, सॉरी... असे म्हणत उत्तर टाळले. देशात आणि महाराष्ट्रात 2014 नंतर दोन समाजात दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येतंय. जे दोन समाजात दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, आम्ही तितक्याच प्रेमानं, समजुतानं, संवादानं वंचित घटकांना जोडण्याचा प्रयत्न करत आहोत, असे सुजात यांनी म्हटले. पत्रकारांनी इतर प्रकारे मनसेबद्दलचा प्रश्न विचारला.
दरम्यान, सुजात यांनी मनसेवर टिका केली. मात्र, मनसेनं तुमच्यावर बोलावं एवढे तुम्ही मोठे नाहीत? असं मनसेनं म्हटल्याचा प्रश्न सुजात यांना विचारण्यात आला होता. त्यावर, लोकशाहीत बाबासाहेबांच्या संविधानाने प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य दिलं आहे. त्यामध्ये, धर्म, जात, जेंडर हा विषय होत नाही, तसंच वय हाही विषय नसावा, असे उत्तर सुजात यांनी दिले.