राज ठाकरे होतील शिवसेनाप्रमुख; प्रकाश आंबेडकर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 08:47 AM2024-05-17T08:47:16+5:302024-05-17T08:47:59+5:30

प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, म्हणूनच मी म्हणेन की लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी मनसे शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन केली जाईल. 

raj thackeray to become shiv sena chief prakash ambedkar claim | राज ठाकरे होतील शिवसेनाप्रमुख; प्रकाश आंबेडकर यांचा दावा

राज ठाकरे होतील शिवसेनाप्रमुख; प्रकाश आंबेडकर यांचा दावा

मुंबई : सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मला कुठेतरी असे जाणवू लागले आहे की, नजिकच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष होतील, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.  प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 

प्रकाश आंबेडकर यांनी एका मुलाखती दरम्यान हे वक्तव्य केले. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सध्या तांत्रिकदृष्ट्या मुख्य नेतेपद निर्माण करण्यात आले आहे. म्हणूनच मी म्हणेन की लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी मनसे शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन केली जाईल. 

 

Web Title: raj thackeray to become shiv sena chief prakash ambedkar claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.