महालक्ष्मी वानखेडकर यांच्या टायनी पेपर आर्टचे राज ठाकरेंनी केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 05:59 PM2019-06-13T17:59:18+5:302019-06-13T17:59:35+5:30

अतिसुक्ष्म पेपर कापून त्यामधून हुबेहूब पक्षांची कलाकृती साकार करण्यात कांदिवलीच्या महालक्ष्मी वानखेडकर यांच्या दुर्मिळ पक्षी साकारण्यात नावलौकिक आहे.

Raj Thackeray visit Mahalaxmi Wankhedkar's tiny paper art exhibition | महालक्ष्मी वानखेडकर यांच्या टायनी पेपर आर्टचे राज ठाकरेंनी केले कौतुक

महालक्ष्मी वानखेडकर यांच्या टायनी पेपर आर्टचे राज ठाकरेंनी केले कौतुक

Next

- मनोहर कुंभेजकर

मुंबई - अतिसुक्ष्म पेपर कापून त्यामधून हुबेहूब पक्षांची कलाकृती साकार करण्यात कांदिवलीच्या महालक्ष्मी वानखेडकर यांच्या दुर्मिळ पक्षी साकारण्यात नावलौकिक आहे. देशातल्या त्या एकमेव टायनी पेपर आर्टिस्ट आहेत.विविध प्रकारचे हुबेहूब पक्षी तयार करण्यासाठी त्यांना किमान 6 महिने ते दोन वर्षं लागतात.त्यांनी तयार केलेल्या  गरुडाच्या प्रतिकृतीला लिम्का बुक ऑफ वर्ल्ड बुकने गौरवण्यात आले आहे.या प्रदर्शनात 22 प्रकारचे विविध पक्षी ठेवण्यात आले आहेत.यामध्ये सुगरण,चिखल खाणारे पक्षी, मकॉव,पेरडाईज,हिमालयातील मेनॉल,टर्की,ग्रे पीकॉक,फ्लेमिंगो,गरुड आणि फुलपाखरांची जन्मावस्था सूक्ष्म पेपर कटिंग आणि पेंटिंग करून त्यांनी हुबेहूब साकारली आहे.

त्यांच्या दुर्मिळ पक्षांचे प्रदर्शन हे जहांगीर आर्ट गॅंलरी येथे भरले असून ते येत्या 17 जून पर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत खुले आहे.प्रदर्शन बघायला कला रसिकांनी गर्दी केली आहे.

या प्रदर्शनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे व आमदार व भाजपा प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी नुकतीच आवर्जुन भेट दिली. तर या प्रदर्शनाचे उदघाटन जहांगीर आर्ट गॅंलरीचे अध्यक्ष आदी जहांगीर यांनी केले.या प्रदर्शनाला अभिनेता अरुण नलावडे यांच्या सह अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे.

राज ठाकरे यांनी टायनी पेपर  कलेबद्धल महालक्ष्मी वानखेडकर यांचे कौतुक केले आणि यांच्या कडून या कलेविषयी आणि पक्षांविषयी माहिती घेतली.या केलेसाठी पेशन्स व हार्डवर्क महत्वाचे असून त्यांना शुभेच्छा दिल्या.तर मी जेजे स्कूल मधून आर्टिस्ट झाले,आणि आपण माझ्या पेक्षा सिनियर होता असे
महालक्ष्मी वानखेडकर यांनी राज ठाकरे यांना सांगितले.

आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, मी राजकारणी माणूस. माझा तसा कलेशी संबंध नाही. मात्र महालक्ष्मी वानखेडकर यांच्या दुर्मिळ पक्ष्यांचे प्रदर्शन बघून भारावून गेलो.आपण  प्रदर्शनाला कसे असे राज ठाकरे यांनी आमदार भातखळकरांना विचारताच,त्या माझ्या कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघातील आहेत,असे उत्तर त्यांनी दिले.

Web Title: Raj Thackeray visit Mahalaxmi Wankhedkar's tiny paper art exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.