राज ठाकरे यांचा कुत्रा बाँड याचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 06:25 PM2018-12-26T18:25:14+5:302018-12-26T18:48:12+5:30

राज ठाकरे यांच्या लाडक्या कुत्र्याचं निधन झालं आहे.

Raj Thackeray's dog Bond passed away | राज ठाकरे यांचा कुत्रा बाँड याचं निधन

राज ठाकरे यांचा कुत्रा बाँड याचं निधन

googlenewsNext
ठळक मुद्देराज ठाकरे यांच्या लाडक्या कुत्र्याचं निधन झालं आहे. राज ठाकरे यांच्या कुत्र्याचं दुपारी दोनच्या सुमारास निधन झालं परळच्या प्राणी रुग्णालया(हाफकीन)त त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुंबई- राज ठाकरे यांच्या लाडक्या कुत्र्याचं निधन झालं आहे. राज ठाकरे यांच्या कुत्र्याचं दुपारी दोनच्या सुमारास निधन झालं असून, परळच्या प्राणी रुग्णालया(हाफकीन)त त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. साडेबारा वर्षांपासून बॉण्ड हा राज ठाकरे यांच्यासोबत होता. राज ठाकरे यांनी स्वतः परळच्या स्मशानभूमीत बाँडला अखेरचा निरोप दिला आहे. बाँड या कुत्र्यानं राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना चावा घेतल्यानं त्याची रवानगी मनसेप्रमुख राज ठाकरे कर्जतच्या फार्महाऊसवर केली होती. त्याच बाँडचं आज निधन झालं आहे.

राज ठाकरेंनी ग्रेट डेन जातीचे दोन कुत्रे पाळले आहेत. खरं तर जेम्स आणि बॉन्डची ही दुसरी पिढी आहे. आधीच्या जेम्स आणि बॉन्डची ही पिल्लं आहेत. ज्युनिअर जेम्स बॉन्डबरोबरच राज ठाकरेंच्या कुटुंबात आणखी एक ग्रेट डेन कुत्र्याचा समावेश झाला आहे. त्याचं शॉन असं नामकरणही करण्यात आलं आहे. या तीन कुत्र्यांसोबत कृष्णकुंजवर आणखी तीन पग जातीचे कुत्रे होते.

सिम्बा-बॅम्बी आणि बोल्ट या श्वान कुटुंबात आणखी असे सदस्य आहेत. म्हणजेच राज ठाकरेंच्या कुटुंबात जवळपास 9 ते 10 कुत्रे आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतः या प्रत्येकाचं नामकरण केलं. बाँडनं शर्मिला ठाकरेंना चावा घेतल्यानंतर सर्वच कुत्र्यांची रवानगी कर्जतच्या फार्म हाऊसवर करण्यात आली होती. राज ठाकरे यांचे श्वानप्रेम लोकांच्या परिचयाचं आहे. कृष्णकुंज या निवासस्थानी गेल्या काही वर्षांपासून हे कुत्रे पाळण्यात आले होते. 

Web Title: Raj Thackeray's dog Bond passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.