अभिनेत्री केतकी चितळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; भेटीनंतर राज म्हणतात की...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 03:01 PM2019-06-21T15:01:21+5:302019-06-21T15:01:48+5:30

सोशल मिडीयावरील महिलांशी मतभेद झाल्यावर काहीजण अत्यंत घाणेरड्या शब्दांत महिलांवर टीका करतात

Raj Thackeray's meeting with actress Ketike Chitale; After the meeting, Raj says ... | अभिनेत्री केतकी चितळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; भेटीनंतर राज म्हणतात की...

अभिनेत्री केतकी चितळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; भेटीनंतर राज म्हणतात की...

googlenewsNext

मुंबई : "सोशल मिडीयावरील ट्रोल्सना तू ज्याप्रकारे रोखठोक उत्तर दिलंस, त्यामुळे अनेक दबलेल्या आवाजांना तू व्यक्त होण्यासाठीची हिंमत दिलीस, त्याबद्दल तुझं अभिनंदन" अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेत्री केतकी चितळेचं अभिनंदन केलं. 

केतकी चितळेवर काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावरील ट्रोल्सनी अत्यंत घाणेरड्या शब्दात टीका केली होती. त्या टीकेला केतकीने एका व्हिडिओ पोस्टद्वारे अत्यंत रोखठोक उत्तर दिलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी जितेंद्र ठाकरे यांच्यासोबत केतकी चितळे आज सकाळी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी आली होती. "राज ठाकरे यांनी माझं अभिनंदन करण्यासाठी मला बोलावलं होतं", अशी प्रतिक्रिया केतकीने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

"सोशल मिडीयावरील महिलांशी मतभेद झाल्यावर काहीजण अत्यंत घाणेरड्या शब्दांत महिलांवर टीका करतात. दुर्दैवाने, आजही महिलांच्या मतांचा, तसंच त्यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा आदर करण्याची वृत्ती समाजात, विशेषतः सोशल मिडीयात दिसत नाही. महिलांवर बीभत्स शब्दात टीका करणाऱ्यांना केतकीने जे रोखठोक उत्तर दिले आहे, ते निश्चितच कौतुकास्पद आहे" असं मत मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी याप्रसंगी  व्यक्त केले.

दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळे हीने शिवसेनेच्या चित्रपट सेनेच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी महिला अभिनेत्री आणि महिलांना अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिली होती.
 

Web Title: Raj Thackeray's meeting with actress Ketike Chitale; After the meeting, Raj says ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.