रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठीच्या मुद्द्यावरून २००६ साली अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २००९च्या विधानसभा निवडणुकीत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. त्यानंतर मनसेच्या मतांना ओहोटी लागली. मात्र, विधानसभेपेक्षा लोकसभा निवडणुकांमधील मनसेच्या मतांची घसरगुंडी मोठी आहे.
- विधानसभेवरच लक्ष केंद्रित करून मनसे इतकी वर्षे निवडणुकीच्या मैदानात उतरत आली आहे. - त्यामुळे २००९ आणि २०१४ च्या लोकसभेत मनसेने अनुक्रमे ११ आणि १० ठिकाणीच उमेदवार दिले होते. - महत्त्वाचे म्हणजे मनसेच्या मतांमध्ये २००९च्या तुलनेत २०१४मध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली होती.
मनसेची कामगिरी (कंसात जिंकलेल्या जागा)निवडणूक लढवलेल्या जागा टक्केवारी मिळालेली मते२००९ लोकसभा ११ (०) ४.१ १५,०३,११८२००९ विधानसभा १४३ (१३) ५.७१ २५,८५,५९७२०१४ लोकसभा १० (०) १.५ ७,०८,११८२०१४ विधानसभा २१९ (१) ३.२ १६,६५,०३३२०१९ लोकसभा लढली नाही ० लढत नाही२०१९ विधानसभा १०१ (१) २.२५ १२,४२,१३५
मुंबईत तीन लोकसभा मतदारसघांत प्रभाव२०१९मध्ये विधासभा निवडणुकीत मुंबईतून मनसेने ४.६२ लाख मते घेतली. सर्वाधिक १.२३ लाख मते उत्तर पूर्व आणि त्या खालोखाल दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ९६,४९८ मते मिळाली होती, तर भाजपचा गड असलेल्या उत्तर मुंबईतून एकूण ६८,२४४ मते मिळवली.
प्रभाव कुठे?- २००९ लोकसभा निवडणुकीत दोन जागांवर दुसऱ्या क्रमांकावर - विधानसभा निवडणुकीत : १४३ जागा लढवून १२ जागांवर दुसऱ्या, तर ५३ ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर- २०१४ लोकसभा निवडणुकीत नऊ ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर.- विधानसभा निवडणुकीत : २१९ जागा लढवून सहा ठिकाणी दुसऱ्या आणि १५ ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर.- २०१९ ०१ जागा लढवून १० ठिकाणी दुसऱ्या आणि २५ ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर.