Join us

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुणे दौरा रद्द, ताप असल्याने घरातच घेणार विश्रांती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 9:06 PM

तळजाई टेकडीवरील प्रकल्पामुळे अतिक्रमण केले जाण्याच्या विरोधात मनसेचं पुण्यात आंदोलन करण्यात येणार होतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार होते

ठळक मुद्देराज यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत, त्यांना 102 ताप होतो, अशी माहिती वसंत मोरे यांनी दिली आहे. यासंदर्भात नेटवर्क 18 लोकमतने वृत्त दिले आहे.  

मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तळजाई टेकडी प्रकल्पाविरोधात 24 ऑक्टोबरला मोठं आंदोलन करण्यासाठी पुण्यात येणार होते. मात्र, राज यांचा पुणे दौरा अचानक रद्द झाला आहे. राज ठाकरेंची प्रकृती बिघडल्याने त्यांनी पुण्यासह राज्यातील इतरही दौरे काही काळासाठी रद्द केले आहेत. पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच, मनसेनं ट्विटवरुनही यासंदर्भात अधिकृतपणे सांगितलंय. 

पुण्यातील मनसेच्या मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार होते. तसेच, तळजाई टेकडीवरील प्रकल्पावर अतिक्रमण केले जाण्याच्या विरोधातही मनसेचं पुण्यात आंदोलन करण्यात येणार होतं. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार होते. मात्र, आता राज यांनी प्रकृती अस्वस्थेमुळे पुणे दौरा रद्द केला आहे. राज यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत, त्यांना 102 ताप होतो, अशी माहिती वसंत मोरे यांनी दिली आहे. यासंदर्भात नेटवर्क 18 लोकमतने वृत्त दिले आहे.  

 

तळजाई टेकडीवरील प्रकल्पाला मनसेचा विरोध

सहकार भागातील तळजाई टेकडीवरील सुमारे 107 एकरच्या जागेवर जैवविविधता वसुंधरेच्या प्रकल्पाचा आराखडा पुणे महापालिका प्रशासनाने मंजुरीसाठी स्थायी समितीला सादर केला आहे. या प्रकल्पामुळे परिसराची जैव विविधता नष्ट होऊ शकते, असे म्हणत नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केला. त्यानंतर, प्राधान्यक्रमाने मनसेनं ह्या प्रकल्पाला विरोध करत 24 ऑक्टोबर रोजी आंदोलन पुकारले होते. त्यासाठी नागरिकांचे 'तळजाई बचाव अभियान'ही सुरु झाले आहे. नागरिकांच्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मनसेनं आंदोलन करण्याचे निश्चित केले होते

दरम्यान, राज ठाकरेंनी गेल्या काही काळात पुण्यात दौरे वाढवले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून विविध मतदार संघाचा ते आढावा घेत आहेत.  गेल्याच महिन्यात राज यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी काही सूचनाही दिल्या. तसेच, पुण्यातील सर्व शाखा अध्यक्षांना नेमणूक पत्रांचेही वाटप केले होते. 

टॅग्स :पुणेराज ठाकरेमनसे