मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून राजन वेळुकरांना हटवले
By admin | Published: February 19, 2015 06:00 PM2015-02-19T18:00:00+5:302015-02-19T18:00:00+5:30
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकर यांना पदावरून पायउतार होण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकर यांना पदावरून पायउतार होण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. पात्रतेच्या नाही तर राजकीय वरदहस्ताच्या बळावर वेळुकर कुलगुरू झाल्याची टीका सुरुवातीपासून होत होती. त्यामुळे राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर वेळुकर यांची गच्छन्ती होणार असल्याचे आडाखे वर्तवण्यात येत होते. अखेर भाजपा व शिवसनेच्या सरकारने वेळुकर यांना हटवण्याचे पाऊल उचलले असून तसे आदेश राज्यपालांनी दिले आहेत.
शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केवळ शैक्षणिक पात्रतेच्या निकषावर कुलगुरूंची नेमणूक करण्यात येईल असे आश्वासन देताना वेळुकर राजकीय वरदहस्तामुळे कुलगुरू झाले असल्याचे सांगितले. तसेच यापुढे तज्५ समिती शैक्षणिक निकषांच्या आधारे अशा नियुक्त्या करेल आणि आमचे सरकार त्यात कुठलाही हस्तक्षेप करणार नाही अशी ग्वाहीही तावडे यांनी दिली आहे.