राजे तुम्ही रयतेला फसवून स्वराज्य कधीच स्थापन करू शकणार नाही- नितेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 09:05 AM2019-02-19T09:05:37+5:302019-02-19T09:05:49+5:30
स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी सेना-भाजपा युतीवर टीका केली आहे.
मुंबईः स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी सेना-भाजपा युतीवर टीका केली आहे. काल उद्धव ठाकरे आणि अमित शहांनी सेना-भाजपा युतीची घोषणा केली. त्यानंतर नितेश राणेंनी ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, माफ करा राजे... तुमच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना तुमचा इतिहास आणि त्या भगव्याचे महत्त्व कळलेच नाही.
आपल्याच रयतेला फसवून स्वराज्य कधीच स्थापन करू शकणार नाही. नितेश राणेंनी ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. आमदार नितेश राणे आणि शिवसेना यांच्यातील वादाचा कलगीतुरा अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. राणेंवर खरमरीत टीका करायला शिवसेना विसरत नाही अन् शिवसेनेचे वाभाडे काढायला नितेश राणे नेहमीच तयार असतात. आता नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या चांगलाच समाचार घेतला आहे.
माफ करा राजे..
— nitesh rane (@NiteshNRane) February 18, 2019
तुमच्या नवाने राजकारण करणाऱ्यांना..तुमचा इतिहास आणि त्या भगव्याचे महत्व कळलेच नाही !!
आपल्याच रयतेला फसवून..
स्वराज्य कधीच स्थापन करू शकणार नाही!!
गेल्या काही दिवसांपूर्वीची नितेश राणेंनी ट्विट करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं होतं. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील लफडे जुनेच आहे. आता, नगरमध्ये ते पुन्हा उफाळून आले आणि भाजपला तेथे महापौर-उपमहापौरपदाची प्राप्ती झाली, असा घणाघात सामनामधून भाजपावर करण्यात आला होता. नितेश राणेंनी सामनातील या अग्रलेखाचा दाखल देत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केलं. बायको असावी तर शिवसेनेसारखीच.... असं ट्विट राणेंनी केलं होतं.