राजेश मुदम यांना सुवर्ण पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 02:00 AM2017-08-14T02:00:51+5:302017-08-14T02:00:51+5:30
महापालिकेचे कर्मचारी राजेश मुदम यांनी श्रीलंकेत नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आशियाई व्हेटरन्स टेबल टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी करत, ५० वर्षे वयावरील गटात सुवर्ण पदक पटकाविले आहे
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेचे कर्मचारी राजेश मुदम यांनी श्रीलंकेत नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आशियाई व्हेटरन्स टेबल टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी करत, ५० वर्षे वयावरील गटात सुवर्ण पदक पटकाविले आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेच्या चमूवर मात करत, मुदम यांचा समावेश असलेल्या ४ भारतीय टेबल टेनिसपटूंच्या चमूने हे अजिंक्यपद मिळविले आहे. कोलंबोजवळील सेंट लेवेनिया या उपनगरातील सेंट जोसेफ स्टेडियममध्ये, दक्षिण आशियाई व्हेटरन्स टेबल टेनिस स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये सांघिक विजेतेपद मिळवीत, सुवर्ण पदक पटकाविणारे राजेश मुदम हे १९७७ पासून स्पर्धात्मक टेबल टेनिस खेळत आहेत. १९८२ पासून ते महापालिकेच्या सेवेत आहेत.