राजेश प्रधान यांच्यासह तिघा पोलीस अधिकाऱ्यांना बढत्या
By Admin | Published: January 5, 2017 04:22 AM2017-01-05T04:22:39+5:302017-01-05T04:22:39+5:30
गेल्या आठवड्याभरापासून प्रतीक्षा असलेल्या राज्य पोलीस दलातील उपायुक्त/अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बढती व बदल्यांना अखेर बुधवारी ‘मुहूर्त’ मिळाला.
मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून प्रतीक्षा असलेल्या राज्य पोलीस दलातील उपायुक्त/अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बढती व बदल्यांना अखेर बुधवारी ‘मुहूर्त’ मिळाला. तिघा अधिकाऱ्यांच्या बढत्यांसह २३ जणांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता येत्या दोन दिवसांत लागू होण्याची शक्यता असून त्यापूर्वी संबंधितांना नवीन जागी कार्यभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
रायगडचे अक्षीक्षक सुवेझ हक यांची पुणे ग्रामीणला बदली करण्यात आली आहे. तर तेथील जय जाधव यांची मुंबईत नियुक्ती केली आहे. मुंबईतील परिमंडळ-७ चे उपायुक्त राजेश प्रधान यांची उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर आयुक्त, तर नायगाव सशस्त्र विभागाचे एम.के. भोसले यांची राज्य सुरक्षा महामंडळात उपमहानिरीक्षक म्हणून बढती करण्यात आली आहे. कोल्हापूरचे अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनाही पुणे शहरात अप्पर आयुक्त म्हणून बढती देण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)