Join us

राजहंस सिंह भाजपात, मुंबई काँग्रेसला हादरा; गटबाजीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 4:16 AM

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कारभाराला कंटाळून काँग्रेसला रामराम ठोकणाºयांच्या यादीत आणखी एका दिग्गज नेत्याची भर पडली.

मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कारभाराला कंटाळून काँग्रेसला रामराम ठोकणाºयांच्या यादीत आणखी एका दिग्गज नेत्याची भर पडली. काँग्रेसचे माजी आमदार राजहंस सिंह यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत गटातील राजहंस सिंह तब्बल ४० वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत होते. पक्षातील उत्तर भारतीय चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. माजी आमदार असणाºया सिंह यांनी महापालिकेत आठ वर्षे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळली होती. तळागाळात जनसंपर्क असणाºया सिंह यांच्या राजीनाम्यामुळे मुंबई काँग्रेसला हादरा बसल्याचे मानले जात आहे. मुंबई काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळलेले राजहंस सिंह शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी भाजपाचा रस्ता पकडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भाजपाने सिंह यांना कालिना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. उत्तर भारतीय मतदारांचे प्राबल्य असणारा हा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे.संजय निरुमप यांच्या मनमानी कारभाराला वैतागून अनेक नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. निरुपम यांच्यावरील नाराजीमुळे महापालिका निवडणुकीपूर्वी गुरुदास कामत यांनी पक्षाच्या अखिल भारतीय महासचिव पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे कामत समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता होती. पक्षसंघटना आणि तिकीटवाटपात डावलले गेल्याची भावनाही अनेक नेत्यांनी व्यक्त केली होती. अलीकडेच प्रदेश काँग्रेसचे माजी महासचिव जयप्रकाश सिंह यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. तत्पूर्वी माजी आमदार रमेश सिंह आणि मुंबई काँग्रेसचे सचिव अजय सिंह यांनीही निरुपम यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप करत भाजपाला जवळ केले.

टॅग्स :इंडियन नॅशनल काँग्रेसभाजपा