मुंबई : कंत्राटदाराकडून मालाडमध्ये म्हणजे महापालिकेच्या पी उत्तर विभागात पुरवली जाणारी खिचडी ही निकृष्ट दर्जाची असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. याची गंभीर दखल पालिकेने घेत कंत्राटदाराला चांगलेच फैलावर घेतले. त्यामुळे त्यांनी आता जेवणाच्या दर्जात सुधारणा करत ‘खिचडी’च्या जागी खाण्याजोग्या ‘राजमा-चावल’ आणि ‘भाजी-चपाती’ पुरविण्यास सुरुवात केली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाउन’दरम्यान गरीब जनतेची उपासमार होऊ नये, या उद्देशाने पालिकेने स्थानिक नगरसेवकांमार्फत जनतेला तयार अन्न पुरविण्याची मोहीम हाती घेतली. पी उत्तर विभागात दिल्या जाणाऱ्या खिचडीचा दर्जा फारच खालावलेला होता. त्यातील भाजी आणि तांदूळ कच्चे असायचे तर कधी त्याची चव खारट आणि तिखट असल्याने ती तोंडातही घेण्याजोगी नव्हती. ही बाब ‘पालिकेची खिचडी निकृष्ट दर्जाची’ या मथळ््याखाली २३ एप्रिल रोजी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती.अन्न पुरवठादारांची कानउघडणी!शिजवलेल्या अन्नाबाबतच्या तक्रारी पत्रकारांकडून आमच्याकडे आल्या. त्यानुसार मी लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अन्न पुरवठादारांची कानउघडणी करण्यात आली. त्यानुसार जेवणाबाबतच्या प्रतिक्रिया ऐकून आम्हालाही समाधानवाटले आहे. - संजोग कबरे, सहायक पालिका आयुक्त, पी उत्तर विभागसहायक पालिका आयुक्त संजोग कबरे यांनी पुरवठा करणाºया कंत्राटदारांना तंबी दिली. कोरोनाच्या या संकटात असे अन्न खाऊन लोक आजारी पडले तर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याइतकी सध्याची स्थिती अनुकूल नाही. त्यानुसार कंत्राटदारांनी अखेर खिचडीच्या जागी दुपारी ‘राजमा-चावल’ तसेच संध्याकाळी ‘भाजी-चपाती’ लोकांना पुरवली.
निकृष्ट खिचडीच्या जागी ‘राजमा-चावल’,‘भाजी-चपाती’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 1:53 AM