Video: राज'माया'... अन् राज ठाकरेंनी कर्ण-बधीर विद्यार्थ्यांना घरीच बोलावून घेतलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 04:17 PM2023-06-23T16:17:32+5:302023-06-23T16:18:01+5:30

मुंबईतील विकास विद्यालयातील कर्ण-बधिर विद्यार्थ्यांना मला भेटायचं आहे, असं मला सांगण्यात आलं.

Rajmaya... and Raj Thackeray called the deaf and hard of hearing students at home in mumbai | Video: राज'माया'... अन् राज ठाकरेंनी कर्ण-बधीर विद्यार्थ्यांना घरीच बोलावून घेतलं

Video: राज'माया'... अन् राज ठाकरेंनी कर्ण-बधीर विद्यार्थ्यांना घरीच बोलावून घेतलं

googlenewsNext

मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांचा स्वभाव एकदम कडक आणि व्यक्तीमत्व आक्रमक असल्याचं अनेकदा त्यांच्या बोलणातून त्यांच्या भाषणातून जाणवतं. गायिका आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही त्यांची इमेज एकदम डॉन सारखी असल्याचं म्हटलं होतं. मात्र, राज ठाकरें यांच्यातील एक हळवा माणूस आज सर्वांनाच पाहायला मिळाला. कारण, नेहमीच राजकीय नेते, दिग्गज कलाकार, उद्योजक आणि वेगवेगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणाऱ्या राज ठाकरेंनी आज विशेष पाहुण्यांसाठी आपला वेळ काढून ठेवला होता. या चिमुकल्यांसह राज यांनी मनसोक्त गप्पा मारत आनंदी क्षण व्यतीत केला. 

मुंबईतील विकास विद्यालयातील कर्ण-बधिर विद्यार्थ्यांना मला भेटायचं आहे, असं मला सांगण्यात आलं. त्या विद्यार्थ्यांना मी घरीच बोलवून घेतलं. खरंच छान वाटलं ह्या मुलांना भेटून. निसर्गाकडून ऐकण्याची क्षमता त्यांना मिळाली नाही, पण त्यांची निरागसता आणि त्यांचा उत्साह शब्दशः कमाल, असल्याचं राज यांनी म्हटलं. तसेच, एका छोट्या मुलीने अगदी हातवारे करून छान कविता म्हणून दाखवली. ह्या सगळ्या मुलांच्या आणि देशातील कर्णबधिर मुलांच्या आयुष्यात कुठल्याच अडचणी नको येऊ देत आणि समाज त्यांना स्वीकारतो आहेच. पण, त्यांच्या गरजांविषयी आपण सगळेच अधिक सजग होऊया अशी इच्छा राज यांनी या भेटीनंतर बोलून दाखवली.

राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन या भेटीचे फोटो आणि भेटीचं वर्ण केलं आहे. राज ठाकरेंमधील हळवा माणूस पाहून, या निरागस चिमुकल्यांना भेटून राज ठाकरेंना मनस्वी आनंद झाल्याचं या फोटोवरुन दिसून आलं.  

राज ठाकरे हे कलाप्रेमी आहेत, ते कलेवर प्रेम करतात. कलाकार हा हळवा असतो, पण राज ठाकरेंचं व्यक्तीमत्व आक्रमक आणि परखड पाहायला मिळतं. ते कमी व्यक्त होतात, पण व्यक्त झाल्यानंतर त्यांची आक्रमकता जास्त दिवस चर्चेत असते. मात्र, राज यांच्यातील संवेदनशीलता या भेटीतून दिसून आली. 
 

Web Title: Rajmaya... and Raj Thackeray called the deaf and hard of hearing students at home in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.