रजनीश सेठ एसीबीत तर बिपीन कुमार सिंह नवी मुंबईचे आयुक्त, आयपीएस अधिकाऱ्यांच्याबदल्यांना अखेर ‘मुहूर्त’!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 06:03 AM2020-09-03T06:03:56+5:302020-09-03T06:04:42+5:30

ज्य गुप्त वार्ता विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांना नागरी संरक्षण विभागात पदोन्नतीवर पाठविण्यात आले आहे. नवी मुंबईच्या आयुक्तपदी बिपीन कुमार सिंह यांची तर सदानंद दाते यांची मीरा भार्इंदरच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Rajneesh Seth in ACB and Bipin Kumar Singh in Navi Mumbai | रजनीश सेठ एसीबीत तर बिपीन कुमार सिंह नवी मुंबईचे आयुक्त, आयपीएस अधिकाऱ्यांच्याबदल्यांना अखेर ‘मुहूर्त’!

रजनीश सेठ एसीबीत तर बिपीन कुमार सिंह नवी मुंबईचे आयुक्त, आयपीएस अधिकाऱ्यांच्याबदल्यांना अखेर ‘मुहूर्त’!

Next

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर बुधवारी मुहूर्त मिळाला. अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) रजनीश सेठ यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) तर एसआयडीतील सहआयुक्त अमितेशकुमार यांची पदोन्नतीवर नागपूरच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
राज्य गुप्त वार्ता विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांना नागरी संरक्षण विभागात पदोन्नतीवर पाठविण्यात आले आहे. नवी मुंबईच्या आयुक्तपदी बिपीन कुमार सिंह यांची तर सदानंद दाते यांची मीरा भार्इंदरच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदल्यांच्या यादीला संमती दिल्यानंतर रात्री उशिरा गृह विभागाकडून एकूण ४९ अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश जारी   करण्यात आले.
नवी मुंबईच्या आयुक्तपदी एसीबीचे प्रभारी बिपीन कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली असून तेथील संजयकुमार यांची
पोलीस मुख्यालयात प्रशिक्षण व खास पथके विभागात बदली करण्यात आली. तर रजनीश सेठ यांची एसीबीचे प्रमुख बनविण्यात आले आहे. त्यांचा कायदा व सुव्यवस्था विभागाचा पदभार राजेंद्र सिंह यांच्याकडे देण्यात आला आहे.
राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या जागी एसीबीतील अपर महासंचालक आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डुंबरे यांच्या जागी मुंबईतील कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रमुख विनयकुमार चोबे यांची बदली करण्यात आली आहे. सुमारे एक वर्षांपूर्वी घोषणा केलेल्या मीरा-भार्इंदरच्या आयुक्तपदी अखेर सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. एसआयडीतील सहआयुक्त अमितेशकुमार
यांची पदोन्नतीवर नागपूरच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तेथील आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची राज्य वाहतुक महामार्गच्या प्रमुखपदी बदली करण्यात आली आहे. तेथील अप्पर महासंचालक विनय कारगावकर यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. रेल्वेतील अप्पर महासंचालक जयजीत सिंह यांची एसीबीत बदली करण्यात आली आहे.
रश्मी शुक्लाही साईडला
फडणवीस यांच्या विशेष मर्जीतील समजल्या जाणाऱ्या एसआयडीच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांची पदोन्नतीवर तुलनेत साईडला पोस्टिंग देण्यात आली आहे.त्याच्यासाठी होमगार्ड व नागरी संरक्षण हे एकत्र असलेले विभाग स्वतंत्र केले आहेत. त्यांची नागरी संरक्षण विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

देवेन भारती यांची उचलबांगडी
एटीएसचे प्रमुख देवेन भारती यांना तेथून हलविण्यात आले असून त्यांना तूर्तास कोणतेही पद देण्यात आलेले नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी असे त्यांना समजले जात होते. तसेच माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्याच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. या दोन्ही बाबी त्यांना भोवल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Rajneesh Seth in ACB and Bipin Kumar Singh in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.